सक्रिय कार्यकर्त्यांचे निधन होणे ही चळवळीची फार मोठी हानी:सुनील वाघमारे
फुले शाहू आंबेडकरी चळवतील सक्रिय कार्यकर्ते दिवंगत सोहन लोंढे यांना पंढरपुरात वाहिली श्रद्धांजली!


जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल
– श्रीकांत कसबे
पंढरपूर :-आज फुले शाहू आंबेडकरी चळवळीत कार्यकर्त्यांची अत्यंत वानवा निर्माण झाली असताना सक्रिय कार्यकर्त्यांचे निधन होणे ही फार मोठी चळवळीची हानी आहे. एक कार्यकर्ता निर्माण होण्यासाठी बराच काळ घालवावा लागतो. चळवळीसाठी सक्रिय कार्यकर्ता निर्माण करणे हीच खऱ्या अर्थाने दिवंगत सोहन लोंढे यांना श्रद्धांजली ठरेल.. असे विचार फुले शाहू आंबेडकर विचार मंचचे अध्यक्ष सुनील वाघमारे यांनी व्यक्त केले.
फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते व डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे युवक प्रदेशाध्यक्ष दिवंगत सोहन लोंढे यांचे नुकतेच सोलापूर येथे दुःखद निधन झाले.
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी पंढरपूर तालुका व शहर डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे श्रद्धांजली सभेचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या सभेचे अध्यक्ष माजी जिल्हाध्यक्ष व माजी नगरसेवक अंबादास वायदंडे हे होते. याप्रसंगी सुनील वाघमारे बोलत होते.


जोशाबा टाइम्सचे संपादक श्रीकांत कसबे, म्हणाले की माझी गेली तीस वर्षे लोंढे परिवाराशी कौटुंबिक संबंध आहेत. चळवळीत सक्रिय असणारा कार्यकर्त्याचे वयाच्या 35 व्या वर्षी सोहन लोंढे यांचे अकस्मात निधन व्हावे ही बाबच धक्कादायक आहे. फुले शाहू आंबेडकरी चळवळीच्या विचारावर आधारित डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष होते. या माध्यमातून त्यांनी अनेक जन आंदोलनात सहभाग घेतला. अन्याय अत्याचाराबाबत त्यांनी अनेक आंदोलने केली. पूर्ण वेळ कार्य करणारा कार्यकर्ता हा आपल्या तब्येतीकडे नेहमी दुर्लक्ष करतो ही बाब फार हानिकारक आहे त्यातूनच अशा दुःखद प्रसंगाला सामोरे जावे लागते.

बहुजन समता पार्टीचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग खिलारे, याने दलित महासंघ व बहुजन समता पार्टीच्या वतीने श्रद्धांजली अर्पण केली.

अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना डी.पी.आय.चे माजी जिल्हाध्यक्ष अंबादास वायदंडे म्हणाली की, एक धाडसी व मनमिळावू कार्यकर्ता आपल्यातून आकस्मात गेल्याने फार दुःख होत आहे. त्यांच्या जाण्याने चळवळीचे डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे व त्यांच्या कुटुंबाचे फार नुकसान झाले आहे ते कधीच भरून निघणार नाही. त्यांचे कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.

यावेळी संतोष सर्वगोड संस्थापक भीमशक्ती सांस्कृतिक मंडळ, ज्येष्ठ नेते तानाजी रणदिवे, बापूसाहेब अवघडे सुनीताताई अवघडे माजी नगरसेविका मंगळवेढा, सुधाकर मस्के, संजय लोखंडे, संजय कांबळे, नानासाहेब लोखंडे, दत्ता लोंढे,अनिल कांबळे, ब्रह्मदेव वायदंडे, शेखर खिलारे, दयानंद वायदंडे, गणेश वाघमारे, अमर जाधव आदी उपस्थित होते. शेवटी मौन उभे राहुन सामूहिक मूक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

सूत्रसंचालन व प्रास्ताविक जीवन कांबळे यांनी केले.



