Uncategorized

पंढरीत साने गुरुजी स्मारकाचा लोकार्पण सोहळा ८ नोव्हेंबरला खा.शरद पवार यांचे हस्ते होणार

याचबरोबर भुकेलेल्यांना अन्नदान सेवाकार्यचा अमृत महोत्सव आणि भारतीय स्वातंत्र्य याचा अमृत मोहत्सव साजरा होणार

 

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर:- साने गुरुजींनी पंढरपूरमधील श्री. विठ्ठल मंदिर समतेच्या विचाराने दलितांना खुले करण्यासाठी प्राणांतिक उपोषण करून वारकरी सांप्रदयाचा समतेचा विचार पुढे नेला. या समतेच्या लढ्याला ७५ वर्ष पूर्ण झाली याचे स्मरण म्हणून संतपेठ तनपुरे महाराज मठात साने गुरुजी स्मारक उभारण्यात आल्याचे तसेच हा लोकार्पण सोहळा खा.शरद पवार  यांच्या शुभहस्ते दि.८नोव्हेंबर२०२२रोजी   होणार असल्याचे  संत तनपुरे महाराज ट्रस्ट चे अध्यक्ष  बद्रीनाथ तनपुरे महाराज व सानेगुरुजी सत्याग्रह समितीचे अध्यक्ष राजाभाऊ अवसक यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.

स्वातंत्र्य सेनानी  साने गुरुजी श्री विठ्ठल मंदिर प्रवेश सत्याग्रह स्मारक लोकार्पण सोहळा व  संत तनपुरे बाबा यांच्या ३७ वा पुण्यस्मरण सोहळा . खा.  शरद पवार यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी  आमदार बबन दादा शिंदे हे असणार असून व संत बद्रीनाथ तनपुरे महाराज है
स्वागताध्यक्ष असणार आहेत.

संत तनपुरे बाबा ३७ वा पुण्यतिथी सोहळा व संत सेनानी साने गुरुजी सत्याग्रह स्मारक लोकार्पण
सोहळ्यासाठी  संत तनपुरे बाबा यांच्या दगडवाडी (जि. नगर) येथून विश्व एकात्मता दिंडी व पालघड (जि. रत्नागिरी) या साने गुरुजी यांच्या जन्म गावापासून समता दिंडी निघणार आहे

वारकरी सांप्रदाय समतेची परंपरा रुजवत असताना पंढरीचा पांडुरंग दलितांसाठी खुला नव्हता त्यासाठी साने गुरुजींनी ०१ मे
ते १० मे १९४७ या कालावधीत  संत कुशाबा तनपुरे महाराज यांच्या मठात प्राणांतिक उपोषण केले या संघर्षातून श्री संत चोखा मेळा यांच्या पुण्यतिथी दिवशी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराची दारे सर्वासाठी कायमची खुली करून उपोषणाची सांगता करण्यात आली तसेच  संत तनपुरे बाबांनी ‘भारत जोडो’ अभियानांतर्गत चारोधाम १२ ज्योतिर्लिंग संपूर्ण भारताची पद यात्रा करून संत विचार व वारकरी सांप्रदायाचा प्रसार केला. तसेच श्री क्षेत्र पंढरपूर भुकेलेल्यांना अन्नदान सेवाकार्यचा अमृत महोत्सव आणि भारतीय स्वातंत्र्य याचा अमृत मोहत्सव साजरा होत आहे या संस्मरणीय घटनेचे औचित्य साधून श्री संत तनपुरे महाराज चारोधाम मंडप ट्रस्ट आणि संत
सेनानी साने गुरुजी सत्याग्रह स्मारक समिती हा सोहळा साजरा करीत आहे.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ह.भ.प. श्री बद्रीनाथ तनपुरे महाराज अध्यक्ष व सर्व विश्वस्त श्री तनपुरे महाराज चारोधाम मंडप ट्रस्ट पंढरपूर व साने गुरुजी सत्याग्रह स्मारक समिती पंढरपूर चे अध्यक्ष राजाभाऊ अवसक कार्याध्यक्ष श्री.ह.भ.प. अनंत महाराज तनपुरे, सचिव दादासाहेब रोंगे, सदस्य निशिकांत परचंडराव, शिवाजी शिंदे सर, अशोक क्षीरसागर, सारंग
कोळी, महादेव (तात्या) कोळी,  कोंडलकर, उपेंद्र टन्नु, नागेश अवताडे, दत्ता तोडकरी, ज्ञानेश्वर बंडगर, इत्यादी मान्यवरांनी समस्त जनतेला सदर कार्यक्रमास उपस्थित
राहण्याचे आव्हान केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close