पंढरीत महाआरोग्य शिबिराचे उद्धघाटन संपन्न
22,23,24 नोव्हेंबर 2023 तीन दिवस चालणार शिबीर

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
-श्रीकांत कसबे

पंढरपूर :-“आरोग्याची वारी,पंढरीची वारी ” पंढरीत कार्तिक वारीसाठी येणाऱ्या लाखो वारकऱ्यावर वैद्यकीय उपचार व्हावेत व वारकऱ्याची सेवा व्हावी या हेतूने आरोग्य मंत्री प्रा. डाँ.तानाजी सावंत यांचे मार्गदर्शनाखाली पंढरीत 65एकर येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले असून या महाआरोग्य शिबिराचे उदघाट्न सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांचे हस्ते संपन्न झाले.

यावेळी प्रा. शिवाजीराव सावंत, भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत, पंढरपूर तालुका आरोग्यधिकारी एकनाथ बोधले यांचे सह वारकरी व शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.


आषाढी वारी मध्ये लाखो वारकऱ्यांनी उपचार घेतले होते. त्याच धरतीवर सावंत बंधूनी कार्तिक वारी मध्ये या महा आरोग्य शिबिराचे आयोजन केले असून हें महाआरोग्य शिबीर दि.22,23,24 नोव्हेंबर तीन दिवस असणार आहें.

या महाआरोग्य शिबिरात प्राथमिक आरोग्य तपासणी, मोफत रक्त चाचण्या, डोळ्याची तपासणी, हाडाची तपासणी, कान, नाक, घसा तपासणी, हृदयरोग तपासणी, ई सी जी तपासणी, मोफत केली जाणार असून यावेळी औषध वितरण, आयुष्यमान कार्ड वितरण, चष्म्याचे वाटप होणार असून गरज पडल्यास शस्त्रक्रिया केली जाणार आहें. यासाठी उच्च व नामांकित डॉक्टर उपस्थित राहणार आहेत.

तीन दिवस आयोजित केलेल्या या महा आरोग्य शिबाराचा लाभ वारकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन सावंत बंधू यांनी केले आहें.



