Uncategorized

 श्री विठ्ठल सह. साखर कारखान्याचा ४१ वा गळीत हंगाम शुभारंभ

 

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपुर:–श्री विठ्ठल सह. साखर कारखान्याचा ४१ वा गळीत हंगाम शुभारंभ दिनांक १६.१०.२००२ रोजी सकाळी • ११.०० वाजता या शुभमुहूर्तावर मा. विरोधी पक्ष नेते आमदार श्री प्रविण दरेकर, आमदार शहाजीबापू पाटील,  शेखर गायकवाड साखर आयुक्त पुणे ,आदी मान्यवरांच्या शुभहस्ते व कारखान्याचे चेअरमन  अभिजीत पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. तसेच कलश पूजन कारखान्याचे संचालक  दत्तात्रय विश्वनाथ नरसाळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

सदर प्रसंगी आमदार श्री प्रविण दरेकर यांनी आपले भाषणात बोलताना म्हणाले की, सहकारी साखर कारखान्याचे सभासद हे मालक आहेत. हा कारखाना वाचविणेसाठी चेअरमन  अभिजीत पाटील यांना मुंबई जिल्हा मध्य. सह. बँकेकडून आर्थिक मदत केली. एखादा कार्यकर्ता जेव्हा चांगले काम करतो तेंव्हा तो कोणत्याही पक्षाचा असला, तरी त्याच्या पाठीमागे सर्वांनी उभा राहिले पाहिजे. शेतकऱ्यांना एफ. आर. पी.साठी आंदोलने करूनही एफ.आर.पी. रक्कम कारखान्याकडून मिळत नाही, त्यासाठी श्री शेखर गायकवाड साहेब यांच्या सारखे सक्षम अधिकारी असतील तरच शेतकऱ्यांना वेळेत एफ.आर.पी. मिळेल  अभिजीत पाटील यांना कारखान्यासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे सांगितले. हा कारखाना गत सिझन बंद अवस्थेत असून देखील ३ महिन्यात कारखाना चालू करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केलेबद्दल चेअरमन श्री अभिजीत पाटील यांचे  कौतुक केले.

       या प्रसंगी बोलताना आमदार
 शहाजीबापू पाटील म्हणाले की, या कारखान्यासाठी आ. दरेकर  यांनी आर्थिक मदत केली. जुन्या आठवणींना उजाळा देत असतांना संस्थापक चेअरमन कै. औदुंबर आण्णा पाटील यांचे वैचारिक वारसदार  अभिजीत पाटील असल्याचे सांगितले. गत वर्षी बंद अवस्थेत असलेला श्री विठ्ठल कारखाना चालू करून चेअरमन  अभिजीत पाटील यांनी शेतकरी सभासदांचा खर्या अर्थानि दुवा घेतल्याचे म्हणाले. अशा तडफदार तरुण कार्यकर्त्यांला पाठबळ देणेसाठी  अभिजीत पाटील यांच्या सारख्या कार्यकर्त्यास विधानपरिषदेवर पाठविण्याचे काम आ.   प्रविण दरेकर यांनी करावे असे सांगितले. तसेच महाराष्ट्र राज्यात सर्वांत जास्त साखर उत्पादन करणारा चेअरमन म्हणून पुढील काळात  अभिजीत पाटील असतील असे म्हणाले.

सदर प्रसंगी बोलताना साखर आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले की, आपल्या संपूर्ण भारत देशातून ११२ लाख मे. टन साखर निर्यात केली असून, यापैकी महाराष्ट्र राज्यातून ७० लाख मे. टन साखर परदेशामध्ये निर्यात केलेली आहे. यावर्षीही विक्रमी साखरेचे उत्पादन होणार आहे. तसेच ऊस उत्पादक सभासद व शेतकरी यांनी कारखान्याच्या अडचणीच्या काळात काही रक्कम ठेवी स्वरूपात ठेवल्यास कारखाना आर्थिक अडचणीतून मार्ग काढून सुस्थितीत येईल, असा प्रयोग महाराष्ट्रातील बऱ्याच सहकारी साखर कारखान्यांनी केल्यामुळे सदरचे सहकारी कारखाने बँकांकडे कर्जासाठी न गेल्यामुळे कारखान्यांचा कर्जाचा डोंगर कमी झाल्याचे सांगितले. यावर्षी महाराष्ट्र राज्यामध्ये साखर कारखान्यातील ऊस तोडणीसाठी ४० टक्के सबसिडीने हार्वेस्टर मशिन खरेदी करणेसाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव दाखल केलेला आहे. महाराष्ट्रातील सर्व कारखान्यांचे हे १५ एप्रिल पर्यंत पूर्ण होईल असे आमचे कार्यालयाकडून नियोजन करण्यात आलेले आहे. जे कारखाने वेळेत ऊस नेतील व ऊस बिल थकविणार नाहीत, अशा कारखान्यांनाच ऊस देण्याचे आवाहन शेतकन्यांना केले. आपल्या कारखान्याचा गळीत हंगाम यशस्वी होणेसाठी शुभेच्छा देऊन, आता पंढरपूर तालुक्याला ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील अशा अपेक्षा व्यक्त केली .
स्वागत व प्रास्ताविक कारखान्याचे  संचालक  तुकाराम मस्के सर यांनी केले, तर कारखान्याचे प्र. कार्यकारी संचालक  डी. आर. गायकवाड यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

या कार्यक्रमासाठी कारखान्याचे व्हाईस चेअरमन सौ. प्रेमलता रोंगे, संचालक सर्वश्री संभाजी भोसले, कालिदास पाटील, दिनकर चव्हाण, सुरेश भुसे, बाळासाहेब हाके, धनंजय काळे, साहेबराव नागणे, कालिदास साळुंखे, सचिन वाघाटे, जनक भोसले, प्रविण कोळेकर, नवनाथ नाईकनवरे, सिताराम गवळी, अशोक जाधव, सिध्देश्वर बंडगर, समाधान काळे, श्रीमती कलावती महादेव खटके, सौ सविता विठ्ठल रणदिवे, तज्ञ संचालक सर्वश्री दशरथ जाधव, अशोक तोंडले, तसेच एम.एस.सी. बँक प्रतिनिधी सी. एस. पाटील, धाराशिव साखर कारखान्याचे एम. डी. श्री अमर पाटील, मुंबई बँकेचे संचालक श्री विठ्ठलराव भोसले, साखर उपआयुक्त श्री संजयकुमार भोसले तसेच दामाजी कारखान्याचे माजी चेअरमन व सिताराम कारखान्याचे चेअरमन श्री शिवाजीराव काळुंगे सर व राजाराम सावंत, कारखान्याचे माजी संचालक, पंढरपूर व मंगळवेढा नगरपालिकेचे आजी-माजी नगरसेवक तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य, सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग, कार्यकर्ते, सभासद, व्यापारी व हितचिंतक उपस्थिती होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close