विद्यार्थ्यांनी दररोज किमान एक पुस्तकाचे पान तरी वाचावे–प्राचार्य राजेंद्र पाराध्ये
विवेक वर्धिनीच्या कनिष्ठ महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन संपन्न

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपुर:-विवेक वर्धिनी कनिष्ठ महाविद्यालय मध्ये भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न, डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य राजेंद्र पाराध्ये होते. त्यांनी विद्यार्थ्यांनी दररोज किमान एक पुस्तकाचे पान एक तरी वाचावे कारण त्याच्यातूनच आपल्याला प्रगल्भ असे ज्ञान मिळत असते असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कनिष्ठ महाविद्यालयाचे विभाग प्रमुख उत्तरेश्वर मुंढे यांनी केले.त्यांनी कलाम यांच्या जीवनातील काही प्रसंग सांगितले.प्रा. तुकाराम मस्के यांनी माणसाच्या जीवनात वाचनाचे महत्त्व किती अनमोल आहे याचे कलाम यांच्या जीवनातील उदाहरणे देऊन सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुकर भोसले यांनी केले.कार्यक्रमासाठी विभाग प्रमुख संजय पवार, ज्येष्ठ शिक्षक संजय चवरे व सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.