Uncategorized

टोकन दर्शनाचे बोगस पास घेऊन टोकन दर्शन रांगेत प्रवेश करणा-या व्यक्तीवर कडक कारवाई : राजेंद्र शेळके 

भाविकांनी मंदिर समितीच्या अधिकृत संकेस्थळावरून बुकींग करावे मंदिर समितीचे आवाहन

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर दि.24 :- श्री विठ्ठल रूक्मिणीमातेच्या दर्शनासाठी येणा-या भाविकांना सुलभ व जलद दर्शन उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने दि. 15 जून पासून टोकन दर्शन प्रणालीची अंमलबजावणी करण्यात आली आहे. तथापि, दि. 24 जून रोजी टोकन दर्शनाचे बोगस पास घेऊन टोकन दर्शन रांगेत प्रवेश करणा-या हिंगोली जिल्ह्यातील 6 व्यक्तींना पोलिसांच्या ताब्यात देऊन कडक कारवाई येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

मंदिर समिती मार्फत दर्शन रांगेतील भाविकांचे सुलभ व जलद दर्शन होण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार टोकन दर्शन प्रणाली सुरू करण्यात आली आहे. त्या टोकन दर्शन प्रणालीचे पासेस मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर बुकींगची सोय आहे. त्यास भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय त्याच्या चांगल्या प्रतिक्रिया देखील उमटत आहेत.

मात्र, दि. 24 जून रोजी सकाळी 9 वाजता हिंगोली जिल्ह्यातील पार्वतीबाई बापूराव बेले, लक्ष्मीबाई केशवराव बळे, संध्या मारूतीराव सातपुते, अरूणा विठ्ठलराव सातपुते, सुधाकर रामचंद्र भालेराव व केशव गणपतराव हरबळे ह्या व्यक्तीं टोकन दर्शन प्रणालीचे बोगस पास घेऊन टोकन दर्शन रांगेतील प्रवेशद्वारावर आल्यानंतर नियमानुसार पासची तपासणी केली असता, पास बोगस असल्याचे सिध्द झाले आहे. त्यामुळे त्यांना पंढरपूर शहर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देऊन, त्यांच्यावर कारवाई करण्याची कार्यवाही सुरू आहे.

मंदिर समितीच्या वतीने असे आवाहन करण्यात येते की, टोकन दर्शन प्रणालीचे पासेस मंदिर समितीच्या https://www.vitthalrukminimandir.org या अधिकृत संकेतस्थळावरून बुकींग करावेत. जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही. याशिवाय, सदरचा पास संपूर्णत: निशुल्क आहे, असे यावेळी व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगितले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close