कु.वृषाली नामदेव सरवदे हिने एम पी एस सी मध्ये मिळविले यश
फुले शाहू आंबेडकर विचार मंच पंढरपूर यांचे वतीने सत्कार

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर :- प्राथमिक शिक्षक व शिक्षक संघटनेचे नेते नामदेव सरवदे यांची कन्या कु.वृषाली नामदेव सरवदे हिने एम पी एस सी मध्ये प्राविण्य मिळविले असून पशू संवर्धन वर्ग 1 या पदावर तिची निवड झाली असून तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होतं आहे.
या कौतुकास्पद कामगिरीची दखल घेऊन फुले शाहू आंबेडकर विचार मंच पंढरपूर यांचे वतीने डाँ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे कु.वृषाली चा सत्कार मंचाचे सल्लागार सन्मानीय सुभाष ढवळे सर, श्रीकांत कसबे, अध्यक्ष सुनील वाघमारे यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष ऍड. कीर्तिपाल सर्वगोड, सचिव जितेंद्र बनसोडे, सह सचिव ऍड. किशोर खिलारे,खजिनदार दादासाहेब दोडके सदस्य अभिराज उबाळे (पत्रकार ) प्राचार्य राजेंद्र पाराध्ये, राजेंद्र सर्वगोड, जितेंद्र आठवले, संतोष पवार, संतोष सर्वगोड डी, राज सर्वगोड, सागर गायकवाड, किशोर दंदाडे, किरण कांबळे, सुकदेव माने, रवी सर्वगोड, कु. वृषाली चे वडील नामदेव सरवदे, ऍड. सायली शेवडे, चंद्रकांत सातपुते सर आदी उपस्थित होते.
हार्दिक अभिनंदन.