सिंहगड पब्लिक स्कूल, कोर्टीचे ९ विद्यार्थी सीबीएसई बोर्डाकडून सन्मानित

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
कोर्टी, पंढरपूर: शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी बोर्ड परीक्षेत सिंहगड पब्लिक स्कूल, कोर्टी पंढरपूर येथील विद्यार्थी आरती मचिन्द्र जाधव, आविष्कार अनंत चव्हाण, अवनी अमित गुंडेवार, दिया अमरिष गोयल, प्रगति भीमराव पडवळे, पुनीत महेश मर्दा, रणजीत सुरेश शिंदे, संग्राम बाबासाहेब फडतरे, यशराज प्रदीप हरीदास यांनी वेगवेलल्या विषयात १०० पैकी १०० गुण संपादन केले होते. सीबीएसई बोर्डासाठी प्रविष्ट होणार्या एकूण विद्यार्थ्यापैकी अशी कामगिरी करणार्या ०.१ टक्के टॉपर्स विद्यार्थ्यांना सीबीएसई बोर्डाने नुकतेच त्यांच्या या अद्वितीय कामगिरी बद्दल प्रमाणपत्र देवून गौरविले आहे. सीबीएसई बोर्डाच्या देशात व देशाबाहेर असणार्या शाळांमध्ये प्रत्येक वर्षी लाखो विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट होत असतात. त्यामध्ये पहिल्या पाचशे विद्यार्थांमध्ये सिंहगड पब्लिक स्कूल, पंढरपूरच्या ९ विद्यार्थांचा समावेश आहे.
विध्यार्थी व शिक्षक यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे हे शक्य झाले असून येणार्या काळात सुद्धा यांच्या पासून प्रेरणा घेवून शाळेतील विध्यार्थी बोर्ड परीक्षेमध्ये जास्तीत जास्त गुण संपादन करण्यासाठी प्रयत्नशील असतील. सिंहगड पब्लिक स्कूलच्या माध्यमातून विद्यार्थ्यासाठी मार्गदर्शनपर विविध उपक्रम राबिवले जात असल्याने विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकत आहेत. त्यामुळे पालकांनीही शाळेत प्रत्येक्ष भेट देवून शाळेचे व शिक्षकांचे कौतुक केले.
यशस्वी विद्यार्थ्याचे पंढरपूर सिंहगड इन्स्टिट्यूटचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. कैलास करांडे, स्कूलच्या प्राचार्या स्मिता नवले, मुख्याध्यापिका स्मिता नायर सह सर्व शिक्षक व शिक्षिका यांनी अभिनंदन केले.