“शिवप्रताप गरुड झेप” हा ऐतिहासिक चित्रपट ५आक्टोंबरला प्रदर्शीत होणार!
चित्रपटाचे पोस्टर लॉंचिंग " हेअरपोर्ट सलुन" मध्ये प्रदर्शित करण्यात आले.

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपुर:- “शिवप्रताप गरुड झेप” हा ऐतिहासिक चित्रपट ५ आक्टोंबरला महाराष्टात सर्वत्र प्रदर्शीत होणार असुन हा चित्रपट सहकुटुंब सहपरिवार सर्वानी पाहीला पाहीजे असे आवहान अभिनेते अजय तपकिरे यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज तसेच अनेक ऐतिहासिक महानाट्या मध्ये आणि शिवप्रताप गरुड झेप मराठी चित्रपटा मध्ये अजय तपकिरे यांनी बर्हिजी नाईक यांची भूमिका साकारली आहे. तसेच” कारभारी लय भारी” या मालिकेत अजय तपकिरे यांनी पिऊच्या वडीलांच्या मुख्य भूमिका साकारली आहे.
“शिवप्रताप गरुड झेप” हा ऐतिहासिक चित्रपट ५आक्टोंबरला प्रदर्शीत हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.
त्यानिमित्ताने या चित्रपटाचे पोस्टर लॉंचिंग ” हेअरपोर्ट सलुन” मध्ये प्रदर्शित करण्यात आले. यावेळी अजय तपकिरे बोलत होते. यावेळी त्यांचा व चित्रपटाचे मेकअप आर्टिस्ट महाराष्ट्र शासन पुरस्कार विजेते अमर झेंडे सर या दोन्ही मान्यवरांचा सत्कार लोकनेते आ.अभिमन्युजी पवार साहेब युथफाऊंडेशन पंढरपूर यांच्या वतीने जोशाबा टाईम्स चे संपादक श्रीकांत कसबे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सुप्रसिद्ध सोहम फेटेवाले महेश आण्णा माने , सतिश भैय्या चव्हाण , मारुती भोसले आदी उपस्थित होते.
या चित्रपटात छ.शिवाजी महाराज यांचे भुमिकेत सुप्रसिद्ध अभिनेते डाँ.अमोल कोल्हे यांची असुन औरंगजेबाच्या भुमिकेत यतीन कार्येकर असुन या चित्रपटाचे निर्माते डाँ.अमोल कोल्हे हे असून दिग्दर्शन कार्तिक राजाराम केंद्रे हे आहेत.या चित्रपटाचे शुटिंग आग्रा येथे व ईतर सात सेटवर झाले आहे हा चित्रपट सर्वांना पहाता यावा यासाठी करमुक्त चित्रपट व्हावा अशी राज्यसरकार कडे मागणी करणार असल्याचे अजय तपकिरे यांनी सांगीतले.