Uncategorized

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेची पंढरपूर शहरातून भव्य मिरवणूक

कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालय व यशवंत विद्यालय यांनी केले आयोजन

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर – ‘येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालय व यशवंत विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या एकशे पस्तीवव्या जयंतीनिमित्तशहरातून त्यांच्या प्रतिमेची फुलांनी सजविलेल्या रथातून, ढोल- ताशा, झांज व लेझीम या वाद्यांच्या निनादात मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षकेतर सेवक, रयत प्रेमी बहुसंख्येने सहभागी झाले होते.’


कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य डॉ. राजेंद्र जाधव व अमरजित पाटील, उपप्राचार्य डॉ. चांगदेव कांबळे, उपप्राचार्य डॉ. लतिका बागल, उपप्राचार्य डॉ. बजरंग शितोळे, जुनिअर विभागाचे उपप्राचार्य बाळासाहेब शिंदे, पर्यवेक्षक युवराज आवताडे, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. रमेश शिंदे, समारंभ समितीचे प्रमुख डॉ. दत्तात्रय डांगे, मुख्याध्यापिका सौ. अनिता साळवे यांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण करून मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली.


या मिरवणुकीत यशवंत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, राष्ट्रपिता महात्मा गांधी आदी महापुरुषांच्या व्यक्तीरेखा साकार केल्या होत्या. त्याचबरोबर या मिरवणुकीत वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात येवून पालखीतून कर्मवीरांची पालखी मिरवण्यात आली. झांज पथकात चाळीस मुलींनी सहभाग घेवून ढोल-ताशाच्या निनादात ताल धरला. त्याचबरोबर पारंपरिक वेशात लेझीम पथकानेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले. महाविद्यालयातून निघालेली ही मिरवणूक सरगम चौक, इंदिरा गांधी चौक, अर्बन बँक, भादुले चौक, नाथ चौक, गांधी रथात असलेल्या प्रतिमेस शहरातील रयत प्रेमींनी पुष्पहार अर्पण केले. त्यात हॉटेल अहिल्या ढाबाचे शंकर खरात, डीव्हीपी ग्रुपचे प्रमुख अभिजित पाटील, विजय माने, रणजीत पाटील, विनोद शंकर पावले, आप्पा चव्हाण आढीव, भारत रोड, चौफाळा, शिवाजी महाराज चौक, स्टेशन रोड, स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, ग्रामीण पोलीस स्टेशन, मार्केट यार्ड ते महाविद्यालय या मार्गाने काढण्यात आली.

या मिरवणुकीवेळी फुलांनी सजविलेल्या शिवदास भिंगे, शंकर विठ्ठल झेंड, मधू फलटणकर, संजुभाई शहा, संजय शहा, अनिकेत मेटकरी, सौरभ चव्हाण, सचिन चौधरी, मल्लिकार्जुन वसेकर, राजेश श्रीकृष्ण दंडे, कैलास कारंडे, संजय मुळे, कृष्णा नानासाहेब वाघमारे नगरसेवक, गणेश अंकुशराव महर्षी वाल्मिकी संघ, निलेश म्हेत्रे, किरण घाडगे, प्रशांत माधव फराटे, माने हार्डवेअर, मनोज सुरवसे, आर. ए. लोमटे, शिवम ज्वेलर्स, गंगा ज्वेलर्स, गाडगे महाराज मराठा धर्मशाळा, जयवंत माने आदी मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केले. वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यानी या मिरवणुकीत सहभागी असलेल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनीना गोळ्या-बिस्किटे व पाणी देण्याचे सत्कार्य केले. त्याचबरोबर निकते मेडिकलने एनर्जी डिंक्स आणि गोळ्या देण्याचे सत्कार्य केले. या मिरवणुकीत जवळपास साडेतीन हजार विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग घेतला. पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री भागवत आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या योग्य नियोजनाने ही मिरवणूक व्यवस्थित पार पडली. मिरवणुकी नंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. शेवटी उपस्थितांचे आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. रमेश शिंदे यांनी मानले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close