पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वाळवा तालुका अध्यक्षपदी रूपाली पेठकर

इस्लामपूर येथे पुरोगामी संघर्ष परिषदेच्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये सौ. रुपाली पेठकर यांना निवडीचे पत्र देताना जिल्हाध्यक्षा सौ वनिता सोनवले प्रा. सुभाष वायदंडे व इतर
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
*इस्लामपूर*:- पुरोगामी संघर्ष परिषदेच्या महिला आघाडीच्या वाळवा तालुका युवती अध्यक्षपदी सौ. रुपाली महेश पेठकर (रा.पेठ ता.वाळवा )यांची निवड करण्यात आलीअसुन इस्लामपूर येथे पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये युवती जिल्हाध्यक्षा सौ. वनिता सोनवले यांनी त्यांना निवडीचे पत्र देऊन सत्कार केला.
यावेळी वाळवा तालुका वरिष्ठ अध्यक्षा लीलाताई संकपाळ, इस्लामपूर शहराध्यक्षा शहनाज जमादार, रुकसाना मुल्ला, सुकेशिनी साठे इत्यादी पुरोगामी संघर्ष परिषदेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. निवडी नंतर रूपाली पेठकर म्हणाल्या महिलांच्यासाठी अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी महिन्याची एकजूट करून न्याय देईन.