कु. मयूरी सुर्यवंशी डॉक्टर होणार ! ‘लसाकम ‘च्या वतीने लातूरात सत्कार

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
लातूर — येथील कु. मयूरी संजय सुर्यवंशी या सुकन्येने यावर्षी झालेल्या नीट परीक्षेत घवघवीत यश मिळवून डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार केले आहे. तीच्या या यशाबद्दल लहुजी साळवे कर्मचारी महासंघ (लसाकम ) च्या वतीने तीचा शाल, पुष्पाहार आणि पेढे देऊन महिलांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रकाशनगर मधील ‘ तिरंगा ‘ निवास मध्ये झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमाचे अध्यक्षपद श्रीमती लक्ष्मी घोडके यांनी भूषविले तर श्रीमती अनिता दोरवे आणि श्रीमती दिपिका दिवेकर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली होती.
यावेळी ‘ लसाकम ‘ चे नियंत्रक नरसिंग घोडके, महासचिव राजकुमार नामवाड आणि जिल्हाध्यक्ष एकनाथ पलमटे यांची शुभेच्छा देणारी भाषणे झाली. राजेंद्र हजारे यांनी प्रास्ताविक केले. नारायण कांबळे यांनी संचलन केले तर संजय सूर्यवंशी यांच्या आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
यावेळी श्रीमती आश्विनी कांबळे, उषा सूर्यवंशी, अनुसया हजारे, अन्नपूर्णा नामवाड, केंद्रे मॅडम, अश्वीनी दत्ता कांबळे, शिवाजी अवघडे, मस्के सर, दहिरे साहेब, केंद्रे सर, पंढरी गायकवाड, डॉ.हजारे आदींची आवर्जुन उपस्थिती होती.