पुरोगामी विचार व शिवाजी महाराजांच्याआदर्शानेच चळवळ यशस्वी–प्रा सुभाष वायदंडे
पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांनी केले इस्लामपूर येथील राज्यस्तरीय बैठकीत मार्गदर्शन

पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांनी इस्लामपूर येथील राज्यस्तरीय बैठकीत मार्गदर्शन
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
इस्लामपूर:- सामाजिक चळवळीच्या माध्यमातून समाजाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर पुरोगामी विचारावर आधारलेली चळवळ आणि सर्व जातींना सामावून घेण्याचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सामाजिक कार्य केल्यास चळवळ यशस्वी होईल असा कानमंत्र देऊन हा आदर्श प्रत्येक कार्यकर्त्याने घेतला पाहिजे असे प्रतिपादन पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांनी केले. ते इस्लामपूर येथे इस्लामपूर पेठ रोड वरील देव सेलिब्रेशन हॉल येथे संघटनेच्या राज्यस्तरीय बैठकीस अध्यक्ष भाषण करताना बोलत होते.
स्वागत व प्रास्ताविक युवती सांगली जिल्हा अध्यक्षा सौ. वनिता सोनवले यांनी केले.
यावेळी प्रा सुभाष वायदंडे यांनी राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांच्या निवडीची घोषणा करून त्यांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार केला. यामध्ये महाराष्ट्र राज्य महिला आघाडीच्या कार्याध्यक्षा म्हणून मुंबई येथील सौ. अनामिका माने यांची निवड करण्यात आली. इतर निवडीमध्ये कोल्हापूर जिल्हाध्यक्ष मुसाभाई मुल्ला यांच्या सल्ल्याने कोल्हापूर जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
यावेळी प्रदेशाध्यक्ष प्राचार्य बाळासाहेब साठे( सातारा ),राज्य संसदीय मंडळाचे सदस्य दादासाहेब कांबळे (सांगली) प्रदेश महासचिव मारुतीराव बोभाटे, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष मुसाभाई मुल्ला, वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष राजेंद्र भिसे (मुंबई) पश्चिम महाराष्ट्रअध्यक्ष अंकुश भोंडे यांची भाषणे झाली.
सदर कार्यक्रमास बँड बँजो व इतर कलाकार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष विजय भाऊ सावंत, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रकाश वायदंडे, सातारा जिल्हा अध्यक्ष सुकेशिनि साठे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षा संगीता भोंडे, पुणे जिल्हा अध्यक्षा कोमल कांबळे, सोलापूर जिल्हा अध्यक्षा ज्योतीताई अवघडे ,सातारा जिल्हा विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष अक्षय नेटके, कराड तालुका अध्यक्ष रंजना जाधव, वाळवा तालुका अध्यक्ष लीलाताई संपकाळ, इस्लामपूर शहराध्यक्षा शैनाज जमादार कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख रुकसाना मुल्ला, हातकणंगले तालुका अध्यक्ष रवींद्र हंकारे, हातकणंगले संपर्कप्रमुख दौलत घाटगे, कोल्हापूर जिल्हा महासचिव जनार्दन घाटगे, कोल्हापूर जिल्हा संघटक प्रशांत जाधव, तालुका कार्याध्यक्ष शिवाजी घाटगे, प्रतिभा गुरव इत्यादी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
शेवटी आभार वाळवा तालुका अध्यक्ष (सरपंच) शिवाजी सकटे ( सरपंच)यांनी मानले.