रिपाई मातंग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हनुमंतराव साठे यांचे दुखःद निधन
विचार ही कधी आला नाही की ही भेट आपली शेवटची असू शकत-- अविनाश रमेशदादा बागवे मा. नगरसेवक पुणे

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपुर:-रिपाई(ए) मातंग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हनुमंतराव साठे यांचे अल्पशा आजाराने १३सप्टेंबर रोजी रात्री अल्पशा आजाराने दुखःद निधन झाले.त्यांचे निधनाने चळवळीचे फार मोठी हानी झाली.सा.जोशाबा टाईम्स शी त्यांचे जिव्हाळ्याचे संबध होते.
विचार ही कधी आला नाही की ही भेट आपली शेवटची असू शकते- अविनाश रमेशदादा बागवे
(मा. नगरसेवक पुणे महानगरपालिका)
—पूना हॉस्पिटल मध्ये दि. ३१ जुलै २०२२ रोजी झालेली आपली भेट आणि २ऑगस्ट रोजी दोन दिवसांनी तुम्हाला हॉस्पिटल मधून मिळणारा डिस्चार्ज, या विषयांवर चर्चा करत असताना, आपली होणारी मस्करी, पुढील सामाजिक कार्य करण्यासाठी आपण केलेले संकल्प, सर्व काही आता फक्त आठवणच….
महाराष्ट्रातील दलित चळवळी मध्ये नेहमी मातंग व बौद्ध समाजाच्या एकोबा राहण्यासाठी नेहमी प्रयत्न करणारे, व त्यातील एक महत्वाचा दुवा असणारे, सतत हसतमुख राहून दुसऱ्यांना देखील नेहमी हसत ठेवणारे, नव्याने स्थापित झालेल्या महाराष्ट्र मातंग समाज संघटना चे अंतर्गत “मातंग स्पीक्स” हा उपक्रम सुरू करण्यात पुढाकार घेणारे, पुण्यातील मातंग मुख मोर्चा च्या नियोजन, आयोजनात अग्रगण्य असणारे, रिपब्लिकन पक्षाचे नेते केंद्रीय मंत्री मा. श्री. रामदास आठवले साहेबांचे खंदे समर्थक, विज्ञान शेत्रात BSc पदवी प्रधान केलेले पण दिसायला ग्रामीण भागातील पुढारी, आणि नेहमी बोली भाषेत बोलून सर्वांना आपल्यातलेच वाटणारे, सामाजिक, राजकीय, पत्रकारिता, श्रेत्रात सर्वांशी चांगले संबंध ठेवणारे, आरपीआय मातंग आघाडी चे प्रदेश अध्यक्ष, श्री. हनुमंत जी साठे साहेब
यांचे दि.13 सप्टेंबर 2022 रोजी रात्री 10 वा. दुःखद निधन झाले आहे.
माझ्या पेक्षा वयाने मोठे असून सुद्धा कधीच मला एकेरी न बोलता, प्रेमापोटी नेहमी ” आमचे लाडके चैरमन अविनाश जी” असा आवाज देणारे हनुमंतराव जीवनाच्या या प्रवासात असे मधूनच अवकाळी तुमचे सोडून जाणे, मनाला चटका लावुन गेले.
महाराष्ट्रातील पूर्ण करोना काळात आपण संपूर्ण राज्य फिरून सामाजिक कार्य केले त्यावेळेस आपल्याला करोना झाला नाही, आणि आता हृदय विकारा च्या उपचारा साठी पूना हॉस्पिटल ला दाखल केल्यावर करोना ने आपल्याला ग्रासले हे धक्कादायक होतं.
जो व्यक्ती पूर्ण आयुष्यात जून २०२२ पर्यंत कधी हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल झाला नाही त्या व्यक्तीस दोनच महिन्यांत हार्ट अटॅक, करोना, ब्रेन स्ट्रोक, मधुमेह, रक्तदाब, किडनी निकामी होणे, सगळे एकाच वेळेस होणे हेच आम्हा सर्वांना चिंतेत टाकणारे होते.
आपल्या जाण्याने, दलित चळवळीचा ची, मातंग समाजाची, रिपब्लिकन पक्षाची, कधी न भरून निघणारी फार मोठी हानी झाली आहे. अशा भावना अविनाश बागवे मा. नगरसेवक यांनी व्यक्त करुन भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.दिवंगत हनुमंत साठे यांचा अंत्यविधी बुधवार दि.१४ सप्टेंबर २०२२ रोजीदु. ३.०० वा. धनकवडी स्मशानभूमी, पुणे येथे होईल.सा.जोशाबा टाईम्स परिवार,पुणे शहर जिल्हा मातंग समाज,,मातंग स्पिक्स् महाराष्ट्र राज्य.मातंग एकता आंदोलन, महाराष्ट्र राज्य ,रिपब्लिकन पार्टी आँफ इंडीया (ए),रिपब्लिकन मातंग आघाडी व विवीध संघटनेच्या वतीने भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.