वायफळे प्रलंबित प्रश्नी स्वतः लक्ष घालणार-जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन
पुरोगामी संघर्ष परिषदेच्या आंदोलनाची घेतली दखल

राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांचे प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी यांना निवेदन देताना जिल्हा अध्यक्षा सौ. पुनम फाळके, सौ.सुनिता खटावकर,वनिता सोनवले, प्रकाश फाळके व इतर
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
सांगली:- पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने वायफळे (तालुका तासगाव) येथील गेले 30 वर्षापासून रेंगाळत असलेल्या नागरिकांच्या समस्या बाबत ग्रामीण जिल्हाध्यक्षा सौ. पूनम फाळके यांचे नेतृत्वाखालील महिला आघाडीच्या शिष्टमंडळाने राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांचे प्रमुख उपस्थितीत निवेदनाद्वारे सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांची समक्ष भेट घेऊन चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी स्वतः याचा अभ्यास करून लक्ष घालणार असे सांगितले.
पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने सदर मागण्यासाठी तासगाव तहसीलवर मोर्चा काढून तहसीलदारांच्याकडून लेखी घेतले होते काही मागण्या ह्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन काही योजना प्रलंबित ठेवल्याप्रकरणी तासगावचे तहसीलदार यांच्यावर कारवाई करण्याची ही मागणी करण्यात आली आहे.
यावेळी राज्य सल्लागार कमिटीचे सदस्य प्रकाशराव फाळके, राज्य उपाध्यक्षा सौ. सुनीता खटावकर, पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस खंडू कांबळे ,वरिष्ठ जिल्हाध्यक्ष सचिन कुराडे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष मुसा भाई मुल्ला, युवती जिल्हाध्यक्षा वनिता सोनवले, युवक जिल्हाध्यक्ष अक्षय खुडे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल वारे , कोल्हापूर संपर्कप्रमुख रुकसाना मुल्ला, मिरज तालुकाध्यक्ष प्रा.भास्कर खिलारे, पलूस तालुका अध्यक्ष अभिजीत लोंढे, तासगाव तालुका अध्यक्षा दिपाली फाळके, इस्लामपूर शहराध्यक्ष शहनाज जमादार, नकुशा चव्हाण, जयश्री फाळके, शैला चव्हाण, संगीता पवार, पल्लवी कांबळे, शंकर थोरात इत्यादी पुरोगामी संघर्ष परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते