जातीचे बांध ओलांडणारं सर्वसमावेशक संघटनच मजबूत राहील –प्रा. सुभाष वायदंडे
एकाच जातीचे संघटन हे मर्यादित होत असलेने सर्व जाती धर्माचे लोक पुरोगामी संघर्ष परिषदे मध्ये सहभागी

पुरोगामी संघर्ष परिषदेच्या कडलास (तालुका सांगोला) नामफलकाचे अनावरण प्रसंगी राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा.सुभाष वायदंडे प्रदेशाध्यक्ष प्राचार्य बाळासाहेब साठे, तालुकाध्यक्ष भीमराव (अण्णा) गडहिरे सरपंच दिगंबर भजनावळे व इतर
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
कडलास- (ता.सांगोला)- अन्यायाच्या विरोधात लढा देऊन तळागाळातील सर्व सामान्य जनतेला न्याय देणाऱ्या अनेक सामाजिक संघटना निर्माण झाल्या परंतु एकाच जातीचे संघटन असल्यामुळे त्या मर्यादित राहिल्याने भविष्यात सामाजिक संघटन जर मजबूत करायचा असेल तर एकाच जातीचे संघटन हे मर्यादित राहील परंतु जातीचे बांध ओलांडून बांधले गेलेले संघटन हे मजबूत राहील आणि अन्यायाच्या विरोधातला लढा जोमानं चालू राहील असे प्रतिपादन पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा सुभाष वायदंडे यांनी केले ते कडलास (ता. सांगोला) येथे संघटनेच्या नामफलकाचे अनावरण प्रसंगी बोलत होते. प्रा.सुभाष वायदंडे पुढे बोलताना म्हणाले आज महाराष्ट्रामध्ये पुरोगामी संघर्ष परिषदेमध्ये अनेक जाती धर्माचे लोक अन्यायाच्या विरोधात न्याय देण्याचे काम करत असून भविष्यामध्ये हे संघटन खूप मजबूत राहील.
स्वागत व प्रास्ताविक सांगोला तालुका अध्यक्ष भीमराव (अण्णा) गडहिरे यांनी केले. यावेळी प्रदेश अध्यक्ष प्राचार्य बाळासाहेब साठे, राज्य उपाध्यक्षा सौ. सुनीता खटावकर, राज्य प्रवक्ता पांडुरंग रणदिवे, संसदीय मंडळाचे सदस्य दादासाहेब कांबळे, नेताजी अवघडे, जिल्हाध्यक्षा सौ ज्योती अवघडे, सोलापूर जिल्हा अध्यक्ष कृष्णाजी गायकवाड, कडलास गावचे सरपंच दिगंबर भजनावळे, सौ. मयुरी सोहनी, सोलापूर जिल्हा युवक संपर्कप्रमुख पांडुरंग ऐवळे, शाखा उपाध्यक्ष सिकंदर सोहनी, खजिनदार बंडू तोरणे ,सचिव अरुण भजनावळे, संपर्कप्रमुख सुदेश भजनावळे ,कार्याध्यक्ष सोपान गडहिरे ,सदस्य दत्ता गायकवाड, लखन कसबे, संजू हत्तेकर, रामा भजनावळे, सुशांत ठोकळे, पिंटू भाजनावळे ,संदेश ठोकळे, नितीन ठोकळे ,किसन गडहिरे, निवृत्ती गडहिरे, नाथा भजनावळे, संतोष भजनावळे ,कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष मुसा(भाई) मुल्ला, सांगली जिल्हा अध्यक्ष राहुल वारे ,अभिजीत लोंढे, आनंद हंकारे ,इत्यादी संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
शेवटी आभार शाखाध्यक्ष नंदकुमार सुरवसे यांनी मानले.