जोशाबा टाईम्सचा १३वा वर्धापन दिन २८आँगस्ट रोजी संपन्न होणार!
विवीध क्षेत्रातील मान्यवरांना "सद्भावना," "प्रेरणा" व "जीवन गौरव"पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात येणार

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
- श्रीकांत कसबे
पंंढरपूर:-सा.जोशाबा टाईम्सचा १३वा वर्धापन दिन रविवार दिं.२८आँगस्ट रोजी सकाळी १०:३० वाजता “विठ्ठल ईन सभागृह”येथे संपन्न होणार आहे.
क्षेत्रातीलकार्यक्रमाचे उद्घाटन अँड.रावसाहेब मोहन( राष्टीय अध्यक्ष, भारतीय लोकशाही राष्टवादी परिषद) यांचे हस्ते होणार असुन अध्यक्षस्थानी प्राचार्य आर.डी.पाराध्ये हे असणार आहेत.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन विभागीय पोलिस अधीक्षक विक्रम कदम,जिल्हा परिषद सदस्य वसंतनाना देशमुख, डीव्हीपी उद्योग समुहाचे सर्वे सर्वा व विठल सह.साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील,विठल सह.साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगिरथदादा भालके, मनसेचे राज्यसंघटक दिलीपबापू धोत्रे,रिपाईचे राज्यसंघटक सुनिल सर्वगोड,नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी सुनिल वाळूजकर,रिपाई प.म.उपाध्यक्ष नंदकुमार केंगार,गौतम विद्यालयाचे मुख्याध्यापक दादासाहेब दोडके,कर्मवीर औदुंबर पाटील प्रशालेचे मुख्याध्यापक सिकंदर ढवळे,सौ.उज्वलाताई भालेराव,(माजी उपनगराध्यक्षा),प्रा.सुरेखाताई नागटिळक भालेराव,(संपादक अखंड न्यूज़ पोर्टल प्राचार्य भाऊसाहेब कांबळे, (सरदार शामराव लिगाडे महाविद्यालय अकोला,)अंकुश शेंबडे(तालुकाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी,पंंढरपूर) प्रा. धनंजय साठे(जिल्हाध्यक्ष, राष्टवादी सामाजिक न्याय विभाग) भारत माळी(अध्यक्ष, अष्टविनायक शिक्षण संस्था)भालचंद्र कांबळे(जिल्हाध्यक्ष, बहुजन समाज पार्टी,सोलापुर)डाँ. मंदार सोनवणे(अस्थीरोग तज्ञ) हे उपस्थित रहाणार आहेत.
मा.एल.एस.सोनकांबळे पंढरपुर
मा.सुभाषराव सोनवणे
या कार्यक्रमात विवीध क्षेत्रातील मान्यवरांना “सद्भावना,” “प्रेरणा” व “जीवन गौरव :पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात येणार असुन बामसेफचे माजी राष्टीय अध्यक्ष,माजी जिल्हा हिवताप अधिकारी एल.एस.सोनकांबळे व जवाहर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व समाजवादी चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते सुभाषराव सोनवणे यांचा “जीवन गौरव” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
सुनिल वाघमारे(अनवली)
बापुसाहेब अवघडे(मंगळवेढा)
रवी शेवडे पंढरपुर
दिपक नाईकनवरे पंढरपुर
पंडित कांबळे उस्मानाबाद
तसेच प्रबुद्ध परिवाराचे मार्गदर्शक सुनिल वाघमारे(अनवली)व साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष बापुसाहेब अवघडे(मंगळवेढा) यांचा “प्रेरणा पुरस्कार”देऊन गौरव करण्यात येणार आहे.
तसेच विवीध क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी करणारे जोशाबा टाईम्स परिवारातील पुढील सदस्यांचा “सद्भावना पुरस्कार” देऊन गौरव करण्यात येणार आहे.
श्रीधर जाधव पुणे
……. प्रा.अरुण कांबळे,वालचंदनगर
डाँ. बी.के.धोत्रे,पंढरपुर
अँड.संजय चंदनशिवे
आण्णासाहेब वायदंडे देगाव
सत्यविजय मोहोळकर पंंढरपूर
रामेश्वर सातपुते पंंढरपूर
अनिल कांबळे पंंढरपूर
“कला“क्षेत्रातील पुरस्कार पंढरपुर येथील गायक कलाकार रवि शेवडे,
क्रिडा -आंतरराष्ट्रीय खेळाडूनी गौरविलेला क्रिकेट पंच दिपक नाईकनवरे(पंंढरपूर)
साहित्य-लेखक, कवि,आत्मकथाकार पंडित कांबळे(उस्मानाबाद)
सामाजिक-इन्साफ,प्रबुद्ध परिवार, सम्राट अशोका सामाजिक संस्थेचे सक्रीय कार्यकर्तै श्रीधर जाधव(पुणे)
शैक्षणीक– विश्वासराव रणशिंग महाविद्याल कळंब वालचंदनगरचे उपप्राचार्य प्रा.अरुण कांबळे
प्रशासकीय-सार्वजनिक बांधकाम विभाग रायगडचे उप कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड(रायगड)
वैद्यकीय-नगरपरिषद पंंढरपूरचे वेद्यकिय अधिकारी व माजी आरोग्याधिकारी डाँ. बी.के.धोत्रे,(पंढरपुर)
विधीज्ञ-नागवंश साहित्य संमेलन संयोजक अँड. संजय चंदनशिवे,
अभियंता-माजी ग्रामपंचायत सदस्य,कुशल बांधकाम तज्ञ आण्णासाहेब वायदंडे,(देगाव ता.पंंढरपूर)
पत्रकारिता-व्यापारी संघाचे अध्यक्ष,दै.नवाकाळचे प्रतिनिधि व कालिकादेवी नागरी सहकारी पतसंस्थेचे माजी चेअरमन सत्यविजय मोहोळकर(पंंढरपूर)
उद्योजक-न.पा.शिक्षण मंडळाचे माजी व्हाईस चेअरमन, चुड्याचे लघु उद्योजक रामेश्वर सातपुते, (पंंढरपूर)
कामगार-नं.पा.चे सफाई कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते अनिल धोंडिराम कांबळे(पंंढरपूर) आदी मान्यवरांचा समावेश होणार आहे.
यावेळी विवीध संघटनेतील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित रहाणार आहेत.
या कार्यक्रमास लेखक,वाचक,हितचिंतक, यांनी उपस्थित रहावे असे आवहान संपादक श्रीकांत कसबे व निमंत्रक अंबादास वायदंडे,कार्यकारी संपादक डाँ. रामदास नाईकनवरे व उपसंपादक विलास जगधने सर यांनी केले आहे.