Uncategorized

हर घर तिरंगा तर मग हर गरीब के घर नोकरी का नाही?-सौ.सुनिता खटावकर

आर्मि मध्ये दर वर्षी ७५००० होणारी भरती रद्द करुन अग्निपथचे गाजर का ? पुरोगामी संघर्ष परिषदेचा  सवाल

सौ.सुनिता खटावकर–राज्यउपाध्यक्षा  महिला आघाडी पुरोगामी संघर्ष परिषद

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कस

सांगली- देशाचा अमृत महोत्सव साजरा होत असताना देशाच्या प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटणं साहजिकच आहे. परंतु ज्यांच्या पाचवीला दारिद्र्य पूजलय, ज्यांना झेंडा लावायला घर नाही, ज्यांनी रस्त्यावरच संसार थाटलाय, जे भूमिहीन आहेत अशा प्रत्येक गरिबाला जर नोकरी देऊन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला असता तर ते स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन ठरलं असतं असं प्रतिपादन पुरोगामी संघर्ष परिषदेच्या महिला आघाडीच्या वरिष्ठ राज्यउपाध्यक्षा सौ. सुनीता खटावकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केले आहे.
प्रसिद्धी पत्रकात सौ. खटावकर यानी पुढे म्हटले आहे की, देशांमध्ये दरवर्षी 75 हजार आर्मी मध्ये ग्रामीण भागातील मुलांना संधी दिली जायची परंतु केंद्र सरकारने कोरोनाच्या नावाखाली ही भरती पन्नास हजारावर आणून केलीच नाही आणि इथून पुढे करतील की नाही याबद्दल शंका असून अग्निपथचे गाजर दाखवून पूर्णपणे खाजगीकरणाकडेच वाटचाल केली असल्याची खंत व्यक्त केली असून यापुढे आर्मी भरतीची तातडीने कार्यवाही न झाल्यास पुरोगामी संघर्ष परिषद ज्या ज्या प्रमुख शहरांमध्ये मिलिटरीचे कँप आहेत त्या ठिकाणी आंदोलन करणार असल्याचे म्हटले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close