साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्त शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण’

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
अजनसोंड ता- पंढरपूर येथे साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या 102 व्या जयंतीनिमित्त अनावश्यक खर्च टाळून गरजू विद्यार्थ्यांना ‘शैक्षणिक साहित्याचे वितरण’ मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.
साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. बिभीषण रणदिवे वजोशाबा टाईम्स चे संपादक श्रीकांत कसबे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सुनिल अडगळे यांच्या वतीने लहुजी ग्रुप आयोजित शाळेतील होतकरू आणि गरजवंत विद्यार्थ्यांना वह्या,पेन, पेन्सिल आदी लेखन साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. बिभीषण रणदिवे म्हणाले की, महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या ‘नाचून साजऱ्या करण्यापेक्षा वाचून साजऱ्या कराव्यात.’ कार्यक्रमाचे अध्यक्ष जोशाबा टाईम्सचे संपादक श्रीकांत कसबे यांनी या उपक्रमाचे स्वागत केले आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार करायचे असेल तर अशा प्रकारचे आयोजन गावोगावी करणे आवश्यक आहे असे सांगितले. सुनिल अडगळे गुरुजी यांनी ‘जयंती साजरी करण्यापाठीमागचा हेतू समाजातील शैक्षणिक क्रांतीसाठी व्हावा आणि त्यासाठी समाजाचे शैक्षणिक प्रबोधन करणे गरजेचे आहे असे सांगितले. यावेळी मार्गदर्शक नगरसेवक अंबादास वायदंडे, कार्यक्रमाचे संयोजक समाधान वायदंडे, देविदास जगताप आदी मान्यवर ,ग्रामस्थ आणि विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत लक्ष्मण बंगाळे यांनी केले. आभार समाधान वायदंडे यांनी मानले आणि सूत्रसंचालन कांबळे डी.बी. सर यांनी केले.