साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त अजनसोंड येथे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न
विवीध क्षेत्रातील मान्यवरासह नवोदितांचा गौरव

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर (प्रतिनिधी) साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंती निमित्त मौजे अजनसोंड , ता . पंढरपूर , जि . सोलापूर येथे ,”साहित्यरत्न गुणगौरव पुरस्कार २०२२” हा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा काल दि. ५ ऑगस्ट २०२२ रोजी संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस जोशाबा टाईम्स चे संपादक श्रीकांत कसबे व पंढरपूर लाईव्ह चे संपादक भगवान वानखेडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या सत्कारानंतर पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.
यावेळी शेख रफिक अब्दुलगनी ( आदर्श शिक्षक ) यांचा गौरव श्रीकांत कसबे (संपादक: जोशाबा टाईम्स)यांचे हस्ते
भगवान वानखेडे पंढरपुर लाईव्ह चे संपादक ( आदर्श पत्रकार ) यांचा गौरव समाधान वायदंडे यांचे हस्ते
अभिराज उबाळे ( आदर्श पत्रकारिता ) ,यांचा गौरव श्रीकांत कसबे (संपादक: जोशाबा टाईम्स)यांचे हस्ते
अँड.किशोर खिलारे ( विधितज्ञ ) ,यांचा गौरव माजी उपनगराध्यक्ष दयानंद वायदंडे हस्ते
रोहित एकमल्ली, एनडीएमजे ( सामाजिक कार्य)यांचा गौरव समाधान वायदंडे यांचे हस्ते
धनाजी वाघमारे साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे संघटना ( समाज भुषण ) यांचा गौरव सुनिल अडगळे ( सर ) यांचे हस्ते
अमित अवघडे- साहित्यरत्न प्रतिष्ठान व शहराध्यक्ष डीपीआय(सामाजिक कार्य ) यांचा गौरव समाधान वायदंडे यांचे हस्ते
संयोजक समाधान वायदंडे यांचा मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी शेख रफिक अब्दुलगनी ( आदर्श शिक्षक ), राम देवकुळे ( सांस्कृतिक विभाग ), भगवान वानखेडे ( आदर्श पत्रकार ) , सविता रामा सुकाळे ( आदर्श शिक्षिका ), गोविंद पाटोळे ( कलाभुषण ) , रोहित एकमल्ली ( सामाजिक कार्य ), अभिराज उबाळे ( आदर्श पत्रकारिता ) , किशोर खिलारे ( विधितज्ञ ) , आकाश भिंगारदिवे ( प्रशासकिय सेवा ) , धनाजी वाघमारे ( समाज भुषण ), अमित अवघडे ( सामाजिक कार्य ) , शैलेश आगावणे ( सामाजिक कार्य ) यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. समाधान लक्ष्मण ( आण्णा ) वायदंडे लहुजी ( वस्ताद ) ग्रुप , LV Grop अजनसोंड यांचे वतीने हा या समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सुनिल अडगळे ( सर ), श्रीकांत कसबे (संपादक: जोशाबा टाईम्स ), अंबादास वायदंडे (मा . नगरसेवक ), सचिन कांबळे (पत्रकार दै . लोकमत ) शिलरत्न झेंडे ( अध्यक्ष , बा . आ . उ . समिती ), यावेळी नंदु खरे ( जिल्हा उप अ .दलित पॅथर ), दयानंद वायदंडे माजी उपनगराध्यक्ष पंंढरपूर, पप्पू वाघमारे ( ता . अध्यक्ष दलित पॅथर ) अनिल कांबळे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाधान वायदंडे यांनी केले तर सुत्रसंचलन व आभार सुनील अडगळे सर यांनी व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाधान वायदंडे,गणेश मसके,आकाश मस्के ,पांडुरंग वायदंडे,आण्णा वायदंडे,शिवाजी मसके,लक्ष्मण बंगाळे,यांनी परिश्रम घेतले.