उद्योजक भावी आमदार राजू खरे यांनी ना. संदीपान भूमरे यांचे पंढरीत केले जंगी स्वागत… .

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपूर/प्रतिनीधी पंढरपूरचे सुपुत्र मुंबई येथील उद्योजक भावी आमदार राजू खरे यांनी राज्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री ना संदीपान भूमरे यांचा पंढरीत जंगी स्वागत केले.
ना. भुमरे हे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरीत आले असता त्यांचा राजू खरे यांनी आपल्या साथीदारांसह उपस्थित राहून सत्कार केला.
राजू खरे हे पंढरपूर येथील सुपुत्र आहेत. त्यांचा मागील अनेक वर्षापासून मुंबई येथे व्यवसाय निमित्त वास्तव्य आहे. मागील अनेक वर्षापासून त्याचे शिवसेनेत कार्य सुरू आहे विद्यार्थी सेनेपासून त्यांनी आपली राजकीय कारकीर्द शिवसेनेत घालवली आहे.
पूर्वीपासूनच राजू खरे हे शिवसेनेचे पक्ष प्रतोद आ. भरतशेठ गोगावले, माजी मंत्री रांमदास कदम, अर्जुन खोतकर, यांच्याशी घनिष्ठ मैत्रीचे संबंध आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खा. श्रीकांत शिंदे यांचे मागील अनेक वर्षापासून संबंध आहेत. त्यामुळे शिंदे गटातील प्रत्येक मंत्री, आमदार,
खासदार, आणि वरिष्ठ पदाधिकारी यांचेशी कायमचे संपर्क असतो.
एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झालेपासून जे कोणी मंत्री आणि वरिष्ठ पदाधिकारी पंढरीत येत असतात, त्यांचे जंगी स्वागत उद्योजक राजू खरे करीत असतात. यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शिंदे गटातील अनेक पदाधिकारी कायम खरे यांच्या संपर्कात राहून आपल्या भागात निधी वाढवत आहेत. मोहोळ मतदार संघातून स्वतः राजू खरे विधानसभा लढविण्यासाठी इच्छुक आहेत. त्या दृष्टीने जबरदस्त तयारी चालू ठेवली आहे. या भागात जास्तीत जास्त निधी मिळविण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून ज्या कामासाठी निधी मिळविला आहे. त्या कामास लवकरच सुरुवात करण्यात येणार असून मोहोळ भागातील अनेक कामाचा शुभारंभ राजू खरे यांच्या हस्ते होणार आहे.
या स्वागताचे वेळी जिल्हाप्रमुख चरणराज चवरे, सोलापूर लोकसभा मतदार संघाचे संपर्क प्रमुख महेश साठे, संजय मस्के,समाधान बाबर,पंढरपुर तालुका प्रमुख शिवाजी बाबर, विजू खरे यांचेसह मोहोळ व पंढरपूर तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.