शिवरायांनी सर्व धर्मातील स्त्रियांना सन्मानाची वागणूक दिली -तालुका अध्यक्षा सुकेशनी साठे

पुरोगामी संघर्ष परिषदेच्यावतीने सवादे (ता. कराड) या ठिकाणी शिवजयंती प्रसंगी सौ. सुकेशनी साठे ,सीमा साठे, कुसूम साठे, रमेश साठे इत्यादी.
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
सवादे:-(ता.कराड)- संपूर्ण जगाला आदर्श राज्यव्यवस्था घालून देऊन स्वधर्माचे रक्षण करत असताना सर्व धर्मांचा आदर करताना सर्वच स्त्रीजातीला सन्मानाची वागणूक देणारे बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज हे जगातील एकमेव राजे असल्याचे प्रतिपादन पुरोगामी संघर्ष परिषदेच्या महिला आघाडीच्या कराड तालुक्याच्या अध्यक्षा सौ. सुकेशनी साठे यांनी केले त्या सवादे(ता. कराड )या ठिकाणी पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन प्रसंगी बोलत होत्या.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कराड तालुक्याच्या उपाध्यक्षा सौ. सीमा साठे यांनी केले. यावेळी कुसुम साठे, वैशाली साठे, उषा सागरे, बबूताई सागरे,राणी साठे, दिपाली साठे ,उषा सागारे, सवादे शाखा अध्यक्ष मधुकर साठे, चंद्रकांत साठे ,सचिव प्रदीप साठे ,आकाश साठे, आनंद साठे, दीपक साठे, शंकर साठे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
शेवटी आभार कराड तालुक्याचे उपाध्यक्ष रमेश साठे यांनी मानले.