मातंग समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमणे त्वरित काढा –पुरोगामी संघर्ष परिषदेची मागणी

पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने बार्शीचे तहसीलदार यांना निवेदन देताना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अविनाश कांबळे, अक्षय तोरडमल, ज्ञानेश्वर कांबळे, दादासाहेब जाधव व इतर
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
-श्रीकांत कसबे
बार्शी:- ऊपळाई ठोंगे येथील मातंग समाजाच्या स्मशानभूमीत दिवसेंदिवस अतिक्रमणात वाढ होत असून याकडे ग्रामपंचायतीचे पूर्णपणे दुर्लक्ष असून सदर अतिक्रमणे ताबडतोब काढण्यात यावीत व बार्शी तालुक्यात अवैधरीत्या दारू धंदा तेजित असून पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असून अवैध धंदे त्वरित बंद करण्यात यावेत या प्रमुख मागण्यांचे निवेदन बार्शी तालुका पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने बार्शी तहसीलदार यांच्याकडे देण्यात आले आहे.
पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष अविनाश कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिष्टमंडळामध्ये जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे, कार्याध्यक्ष अक्षय तोरडमल, सोलापूर जिल्हा सरचिटणीस दादासाहेब जाधव, ग्रामीण जिल्हाध्यक्ष शंकर कांबळे इत्यादी प्रमुख पदाधिकारी होते.
सदर कारवाई दहा दिवसाचे आत न झालेस बार्शी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.