सहकारी संस्थांच्या निवडणुकीमधील अघोरी प्रथा ! सावध ऐका पुढील हाका–अमरजीत पाटील

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
श्री विठ्ठल सहकारीच्या पाठोपाठ आज दामाजी साखर कारखान्याची निवडणुक पार पडलेली आहे.श्री विठ्ठल सहकारी व दामाजीच्या निवडणुकीमध्ये एक समान बाब समोर आलेली आहे.ती म्हणजे मतदानासाठी सभासदांना पैसे वाटप करण्यात आलेले आहेत.दोन्ही कारखान्याच्या निकालामध्ये सत्ताधारी झालेल्या व होणार्या पॅनलकडून प्रचंड प्रमाणात पैशाचे वाटप करण्यात आलेले आहे.याबाबत कुणी उघड बोलत नसले तरी जे घडले आहे ते सर्वांनाच माहिती आहे.याठिकाणी पैसे वाटून सत्ता मिळवणार्या लोकांना दोष देण्यापेक्षा पैसे घेऊन मतदान करणार्याचा जास्त दोष दिला पाहिजे.
राजकारण आणि सत्ताकारण म्हटले की जय – पराजय आलाच.येथे कुणी ही विजयाचा ताम्ररपट घेऊन जन्माला आलेला नाही.परंतु,मुख्य मुद्दा हा आहे की,ज्या संस्थेवर आपला प्रपंच,आपली चुल अवलंबून आहे.त्या संस्थेच्या निवडणुकीमध्ये जर सभासद – शेतकरी पैसे घेऊन मतदान करीत असेल तर भविष्यात कारखानदाराने ऊसाचे बील नाही दिले तर किमान बोंबा तरी मारु नये.कारण,उद्या एखादा कारखानदाराने,*”मतदानाला पैसे दिलेत,बील दिले नाही म्हणून जास्त आवाज चढवून बोलायची गरज नाही.”* असे शेतकर्यांना सुनावले तर कुणी वाईट वाटून घ्यायची गरज नाही.आणि बीलासाठी कुणी आंदोलने ही करायची गरज नाही.अशी भावना अमरजित पाटील.तालुकाध्यक्ष,पंढरपूर तालुका काॅंग्रेस कमिटी.
संस्थापक,कर्मवीर औदुंबरआण्णा पाटील प्रतिष्ठान,पंढरपूर. यांनी व्यक्त केली.
ज्या सहकाराची रचना आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी केली.जो व्यक्ती आज तुम्हाला विकत घेतोय तो उद्या तुम्हाला विकल्याशिवाय राहणार नाही.हा व्यवहार आहे.सहकारी संस्थांच्या निवडणुकीमध्ये सुरु झालेल्या या आघोरी प्रथेला वेळीच पायबंद घातला गेला नाही तर तो दिवस दुर नाही.ज्या दिवशी ऊस उत्पादक असणारा मोठ्यातला मोठा बागायतदार आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही.अजून ही वेळ गेलेली नाही…सुधरा !!!
सावध ऐका पुढल्या हाका…!!