पारधी समाजातील गरिब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप संपन्न
पुरोगामी विचार मंच महाराष्ट्र, विठ्ठल उमप फाउंडेशन आणि क्रांती संस्था यांचा उपक्रम

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पुणे:-सुनिता भोसले या सामाजिक कार्यकर्त्यां गेली अनेक वर्षे पारधी,बौध्द,मातंग,चर्मकार समाजातील गरिब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणून टिकवून ठेवण्याच्या साठी सामाजिक व शैक्षणिक कार्याबरोबरच समाजातील वंचित मुलांच्या शिक्षणासाठी त्या तळमळीने काम करत आहेत.* कोरोनाच्या महामारीने त्यांच्या या कार्याला खिळ बसू नये म्हणून त्यांच्या पुढाकारातून पारधी- आदिवासी समाजातील शिक्षण घेणा-या गरजू गरिब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याच्या वाटपाचा कार्यक्रम *कुरूळी,ता,शिरूर येथे दिनांक 10 जून 2022 रविवार रोजी पुरोगामी विचार मंच महाराष्ट्र चे अध्यक्ष बंडु घोडे सर,नंदेश विठ्ठल उमप, महासचिव शरद लोखंडे यांच्या हस्ते संपन्न झाला आहे.
या प्रसंगी बोलताना पुरोगामी विचार मंच महाराष्ट्र चे संस्थापक /अध्यक्ष बंडु घोडे सर यांनी फुले, शाहु आंबेडकर यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची माहिती देत सरपंच व उपसरपंच यांनी या समाजातील कुटूंबाला घरकुल सारख्या योजना देवून निवा-याची सोय करून द्यावी जसे की शाहु महाराजांनी 1912 साली एक अध्यादेश काढून भटक्या विमुक्त जमातीना घरे बांधण्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्यात आला होता.*
*आणि गुन्हेगार ठरवलेल्या या समाजावरील गुन्हेगारी चा कलंक पुसण्यासाठी 1 आॅगष्ट 1918 विशेष अध्यादेश काढला होता याच दिशेने काम करत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानात शिक्षण मूलभूत हक्क समाविष्ट करत सर्व भारतीय समान आहेत व जातीवरून कोणाला ही गुन्हेगार ठरवता येणार नाही असे प्रतिपादन केले. आज आषाढी एकादशीच्या सर्वांना शुभेच्छा पण या आषाढी एकादशीच्या जशी दिंडी,वारी निघते तशीच शैक्षणिक वारी-दिंडी या परिसरातून निघाली पाहिजे व समाजिक परिवर्तनाच्या चळवळीतील समर्थकांनी,कार्यकर्ते ,नेते, संघटना,संस्था,कर्मचारी,अधिकारीवर्ग,उद्योजकांनी इत्यादी या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन करुन पुरोगामी विचार मंच महाराष्ट्र च्या वतीने शैक्षणिक साहित्य मदतीसाठी महासचिव शरद लोखंडे यांना क्रांती संस्थेच्या अध्यक्ष सुनिता भोसले यांच्या कडे पंधरा हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्याची विनंती केली.
तर प्रसिद्ध लोकप्रिय गायक नंदेश विठ्ठल उमप यांनी उपस्थितसर्वांना मार्गदर्शन करत विठ्ठल उमप फाउंडेशन च्या वतीने क्रांती संस्थेच्या अध्यक्ष सुनिता भोसले यांच्या कडे दहा हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.शरद लोखंडे यांनी ही आपल्या मनोगत व्यक्त करताना उपस्थितांना प्रेरीत केले.
या वेळी 200 पानी वह्या ,स्क्वेअर वही ,चौकोनी वही,चार रेघी वही,पेन बाॅक्स ,पेन्शिल बाॅक्स,कलर खडू,रंगपेटी, पाटी, स्केचपेन, कंपास पेटी, स्कूलबॅग लाॅगबुक,व ड्रेस इत्यादी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
या वेळी क्रांती संस्थेच्या अध्यक्ष सुनिता भोसले यांनी मी शाळेत शिकले नाही पण मला डॉ बाबासाहेब आंबेडकर व ईतर महापुरूषांच्या विचारांची ओळख झाल्यावर मी मुक्त विद्यापीठातून बी. ए. पर्यंतचे शिक्षण घेतले पण माझ्या पारधी- व आदिवासी समाजाच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी व त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करते आहे तेव्हा समाजातील सदन व लोकांनी, संघटनेने, संस्थेने या कामी विद्यार्थ्यांसाठी मदत करावी व साहित्य किंवा दानशूर व्यक्तीना प्रोत्साहन देवून ही आपण मदत करू शकतात. अशी विनंती केली.
या प्रसंगी सरपंच – उपसरपंच व ग्रामस्थांनी मनोगत व्यक्त केली.
*या मुलांना शालेय शैक्षणिक साहित्य वाटपासाठी प्रत्यक्ष मदत करणारे दानशूर व्यक्ती 1) बंडू बाबुराव घोडे 10,000 2 ) बिरारी सर शै.साहित्य 9,000 3) डॉ. सुषमा बसवंत 5,000 4) रामदास सकट शै. सा. 1,000 5) बी. के. ठाकरे शै. सा. 1,000
6) डॉ. बी.वाघ शै. सा. 10,00 जमा निधी 27,000/-
1)ड्रेस व शै.सा.खर्च 12,000/-2) चेक प्रदान रु 15,000
एकुण खर्च रु 27,000/- नंदेश उमप चेक प्रदान10,000/-
एकुण मदत रु. 37,000/- यांनी सहकार्य केले ..
तर या कार्यक्रमास शिरूर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक मा.श्री.सुरेशकुमार राऊत,सौ.राऊत मॅडम,क्रांती संस्थेच्या संस्थापिका मा.सुनीताताई भोसले,कुरुळी गावचे सामाजिक कार्यकर्ते मनोहर बोरकर, ग्रा.पं.सदस्य संभाजी घोरपडे,सामाजिक कार्यकर्ते भैय्या देशमुख,सचिन बोरकर,दीपक धारवाड, शाम धारवाड,संदीप पवार,अमोल काळे,नाना पवार,रामकृष्ण बर्डे,गोरख काळे,इत्यादी तसेच निमोणे गावचे युवा नेते मयूरशेठ ओस्तवाल, क्रांती संस्थेचे मा.बिभीषण गायकवाड,प्रतीक जाधव, बाळू जाधव,अरुण पवार,सामाजिक कार्यकर्ते अनिल जाधव,जयराम कांबळे व मोठ्या संख्येने आदिवासी बांधव,भगिनी विद्यार्थी आदी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रांती संस्थेच्या कार्यकर्त्यांनी परीश्रम घेतले.