बँड बाजा व इतर कलावंतांचे आर्थिक विकास महामंडळासाठी टोकाचा लढा–विजयभाऊ सावंत

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
सातारा:- गेली अनेक वर्षे बँड ,बाजा व इतर कलावंताचे आर्थिक विकासासाठी महाराष्ट्र शासनाने आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यासाठी मागण्या करण्यात आल्या, तरीसुद्धा शासन याच्याकडे डोळेझाक करत असून चालू परिस्थितीमध्ये कोरोना काळाचा जर विचार केला तळ बँड बाजा व इतर कलावंत देशोधडीला लागलेले आहेत त्यांना कोणतीही बँक कर्ज पुरवठा करत नाही अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र शासनाने सदर कलावंतांचे साठी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करून अल्प व्याजदराने कर्जपुरवठा करावा व कलावंतांचे जीवनमान सुधारावे यासाठी वेळप्रसंगी बलिदान देणार असल्याची भूमिका घेऊन टोकाचा लढा उभारणार असल्याचे प्रतिपादन पुरोगामी संघर्ष परिषदेच्या बँड बाजा व इतर कलावंत आघाडीचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष विजय भाऊ सावंत यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात केले आहे.
सावंत यांनी प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे की,थोड्याच दिवसात पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांचे नेतृत्वाखाली माननीय शरद पवार ,अर्थमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष ना.जयंतराव पाटील व जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांना शंभर पथकांचे मालकांचे शिष्टमंडळ भेटून इतर मागण्याही मांडणार आहोत.



