खैरलांजी ते मनोज आव्हाड चळवळ सत्तेसाठी, समाजासाठी का प्रसिद्धी साठी? :-राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांचा सवाल

. प्रा.सुभाष वायदंडे
राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
इस्लामपूर:- पुरोगामी महाराष्ट्रामध्ये फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांनी अनेक चळवळी समाजाला न्याय देऊ शकल्या नाहीत किंवा समाजाचे रक्षण ही करू शकल्या नाहीत.
सत्तेतून चळवळ आणि चळवळीतून सत्ता असं सूत्र अनेक नेत्यांनी वापरलं परंतु समाजासाठी त्याचा वापर झाला की स्वतःसाठी केला. चळवळीचा दिखाऊपणा करून सत्तेत जाणाऱ्यांनी फक्त स्वयंकेंद्रित एकच विचार केल्यामुळे समाज आधांतरी लटकला आंबेडकरी चळवळीने जातीवादी पक्षाशी जवळीक केली परिणामी पुरोगामी विचारांचा विसर पडून समाजाप्रती असलेलं कर्तव्यच विसरल्यामुळे खैरलांजी पासून मनोज आव्हाड सारख्या घटना घडत राहिल्या*
*घटना घडल्यानंतर चार दोन लोकांचे शिष्टमंडळ घेऊन पीडित कुटुंबाला भेट देणे श्रद्धांजली वाहायची आणि आश्वासने द्यायची या पलीकडे आम्ही काय केलं ? असे अनेक प्रश्न आज उभा आहेत मग चळवळ सत्तेसाठी ?,प्रसिद्धीसाठी ? का समाजासाठी अशा अनेक प्रकारच्या प्रश्नांना उत्तर देणे सद्यस्थितीत योग्य असून त्या दिशेनं भक्कम आखणी करण्याची गरज असल्याचे परखड मत पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष संघर्षनायक प्रा. सुभाष वायदंडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.
*प्रा. सुभाष वायदंडे यांनी प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे की औरंगाबादच्या मनोज आव्हाडला जर न्याय द्यायचा असेल तर* *महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयाला एकाच वेळी टाळे ठोकण्याची तयारी सर्व सामाजिक संघटनांनी मिळून ठेवली पाहिजे आणि याबद्दलची आखणी राज्यभर लवकरच पुरोगामी संघर्ष परिषद स्वतःच्या जबाबदारीने घेणार असून राज्याच्या गृहमंत्र्यांना शिष्टमंडळ भेटून यावर चर्चा करणार असल्याचे म्हटले आहे.