डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सामाजिक उपक्रमांनी साजरी करणार .— युवानेते इंजि.निलेश जाधव.

युवानेते इंजि.निलेश जाधव.
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपुर- ,विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती संपुर्ण विश्वामध्ये मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात येते. पंढरपुर शहरामध्ये युवा नेते इंजि.निलेश जाधव मित्र परिवारच्या वतीने महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सामाजिक उपक्रम नी साजरी करण्यात येणार आहे.अशी माहिती प्रसिध्दीपत्रकाद्वारे युवानेते इंजि. निलेश जाधव यांनी दिली आहे.
महामानवाच्या विचारांची प्रेरणा घेऊन व डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेल्या सामाजिक संकल्पनेतून महामानवाची जयंती साजरी करण्यात येणार आहे.
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळ्यास होत असलेल्या डीजे, ढोल ,ताशे यांवरील अनावश्यक खर्च टाळून; लोकोपयोगी उपक्रम निलेश जाधव मित्र परिवार डाॅ बाबासाहेब आंबेडकर नगर पंढरपुर यांच्यावतीने राबविण्यात येणार आहेत.
शहरातील बेघर नागरिक,अनाथाश्रम,
बालकाश्रम,शहरातील संगोपण संस्था याठिकाणी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच बहुजन समाजामधील स्पर्धा परिक्षा देत असलेल्या होतकरू विद्यार्थ्यांना संपूर्ण शैक्षणिक संच वाटप करण्यात येणार आहे .
तसेच शहरातील गरजू विद्यार्थ्यांना संपूर्ण शालेपयोगी साहित्य वाटप करण्यात येणार आहे. इयत्ता दहावीतील गरजू मेहनती विद्यार्थ्यांना निलेश जाधव मित्र परिवारच्या वतीने डाॅ.बाबासाहेब आंबेडकर प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती देण्यात येईल.
महामानवाच्या विचारांची अधीन राहून डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सामाजिक उपक्रमांनी साजरी करणार असल्याचे युवा नेते निलेश जाधव यांनी सांगितले.