Uncategorized
जीवनापेक्षाही भव्य असा एकलव्य गुरूद्रोणाचार्यापेक्षाही श्रेष्ठ– अनिल (बापू)पानपाटील

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्ट
श्रीकांत कसबे
कठोरा:- (ता.चोपडा जि.जळगाव):- न शिकवलेल्या शिक्षणाची गुरूदक्षिणा म्हणून व आपण पारंगत केलेल्या अर्जुनापेक्षाही कोणी धनुर्विद्येमध्ये श्रेष्ठ असू नये यासाठी जीवनापेक्षा ही भव्य असणाऱ्या एकलव्याचा अंगठा मागून पाप चक्रात अडकण्याचे काम गुरु द्रोणानी जरी केले असले तरी इतिहास वीर एकलव्यामुळेच द्रोणाचार्यांना ओळखतो आहे असे प्रतिपादन पुरोगामी संघर्ष परिषदेचे राज्याचे (वरिष्ठ) उपाध्यक्ष मा. अनिल (बापू) पानपाटील यांनी केले कठोरा (ता. चोपडा )या ठिकाणी वीर एकलव्य जयंतीनिमित्त बोलत होते.
यावेळी पुरोगामी संघर्ष परिषदेचे उत्तर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष धर्मा दादा भिल , चोपडा तालुका उपाध्यक्ष नारायण (दादा) पानपाटील, चोपडा तालुका अध्यक्ष खुशाल भिल व ग्रामस्थ उपस्थित होते.





