पुरातन वारसा जतन करणे आपणा सर्वांची सामूहिक जबाबदारी- उमेश परिचारक
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे ऒचित्य साधुन पंढरपूर सायकलर्स क्लब कडून महाराष्ट्र बारव मोहीम अंतर्गत तालूक्यातील ऎतिहासीक "बाजीराव विहीर" येथे भव्य व विलोभनीय असा दिपोत्सव साजरा.

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपूर :-हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती च्या निमित्ताने सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असण्यार्या पंढरपूर सायकलर्स क्लब च्या वतीने वाखरी ता पंढपूर येथील ऐतिहासिक बाजीराव विहिरीची महाराष्ट्र बारव मोहिमे अंतर्गत स्वच्छता करून त्या ठिकाणी भव्य व विलोभनीय असा हा दीपोस्तव साजरा करणे ही अभिमानास्पद बाब आहे. अशा प्रकारचा पुरातन वारसा जतन करणे ही आपणा सर्वांची सामूहिक जबाबदारी असून येणार्या पिढीला अशा वास्तूंचा अभ्यास करता यावा , त्या बद्दलचा इतिहास माहिती व्हावा या करीता समाजातील जागरूक वर्गाने पुढे येऊन असा वारसा जतन करण्यासाठी प्रयत्न करावेत. विशेषत: युवा वर्गाने पुढे येणे ही काळाची गरज आहे. आमच्या पंढरपूर सायकलर्स क्लब च्या अशा मोहिमे मध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे व पुरातन वारसा जतन करण्यासाठी सामाजिक बांधिलकी समजून काम करावे. असे मत पंढरपूर सायकलर्स क्लब चे अध्यक्ष उमेश परिचारक यांनी व्यक्त केले.
या वेळी बोलताना नगरसेवक श्री.अदित्य फत्तेपूरकर म्हणाले की, सर्वात महत्वाचे म्हणजे ही पुरातन विहीर महामार्गात बाधीत होणार होती ती ग्रामस्थ व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांच्या प्रयत्नाने स्वत: केंद्रीय मंत्री श्री.नितीनजी गडकरी साहेब यांच्या मुळे वाचली.अन्यथा हा ठेवा नष्ट झाला असता.आपण तो जपला पाहीजे ही आता सर्वांची जबाबदारी आहे असे मत व्यक्त केले.
यावेळी वाखरी गावातील युवक व पंढरपूर सायकलर्स क्लबचे सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या सर्व सन्माननीय सदस्यांच्या उपस्थीतीत आयोजित करण्यात आलेला दीपोत्सव हा अतिशय विलोभनिय असा होता. या ऎतिहासीक,पुरातन विहीरीवर झालेला दिपोत्सव हा उपस्थितांच्या डोळ्यांचे अक्षरक्ष: पारणे फेडणारा नेत्रदीपक व न भुतो न भविष्यती असाच होता. पंढरपूर सायकलर्स क्लब च्या या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कॊतूक होत आहे
या वेळी क्लबच्या सदस्यांनी विहीरीची वर पासून खाली पर्यंत सर्व सदस्यांनी अतीशय उत्साहात साफसफाई केली.
या निमित्ताने का होईना पण पुरातन वारसा हा लक्षवेधी व्हावा बस..! येणा-या काळात हा वारसा जोपासला जावा,स्वच्छ व पहील्या सारखा निर्मळ व्हावा अशी अपेक्षा क्लबच्या सदस्यांनी व्यक्त केली आहे.