बोरगाव माळेवाडी प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यां समोर दिला जाब !

चर्चा करताना सोबत मनोज जगताप,बच्चन साठे,महावीर कांबळे अविनाश सोनवणे, संजय नाईकनवरे,करण कांबळे धनाजी नाईकनवरे, चिंतामणी जगताप,सह महिला उपस्थित होत्या
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
अकलूज:-बोरगाव माळेवाडी या प्रकरणात दाखल असलेल्या ॲट्रॉसिटी अँक्ट समर्थनात व इतर विविध मागण्यांसाठी दि. २१/९/२०२१रोजी बहुजन योद्धाच्या वतीने आयोजित केलेल्या ” जाब दो ” आंदोलनाला प्रांताधिकारी आणि पोलिस निरीक्षक अकलूज,तहसीलदार, बीडीओ माळशिरस यांनी अकलूज प्रांत कार्यालय या ठिकाणी सर्वानी एकत्र बसून समक्ष आंदोलकांना तपास कुठपर्यंत आला आहे व या पुढे काय करणार आहात हा जाब विचारला होता .
बोरगाव माळेवाडी अत्याचार प्रकरणी अजून पर्यंत कोणत्याही प्रकारची कार्यवाही का झालेली नाही तसेच पीडित कुटुंबाच्या समस्या सुटल्या नाहीत म्हणून शेखर भैय्या खिलारे व मित्र मंडळाच्या व बहुजन योध्दाच्या वतीने प्रांत कार्यालय व उपविभागीय पोलीस कार्यालय या ठिकाणी एकत्र येऊन निवेदन देऊन “जाब दो “म्हणून प्रशासनास जाब विचारण्याचे आयोजन केले होते. पण प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन संबंधित प्रकरणामधील अधिकारी , प्रांताधिकारी मा.विजय देशमुख, सो.तहसीलदार जगदीश निंबाळकर,सहाय्यक बीडीओ शिवाजी पाटील या मुख्यअधिकाऱ्यांशी आंदोलक शेखरभैय्या खिलारे सह पिडित कुटुंबातील मिथुन साठे,सुरेश साठे,अनिकेत साठे,यांनी समक्ष चर्चा करून तात्काळ स्मशान भूमीसाठी व घरासाठी रस्ता द्यावा.या प्रमुख मागण्यांसाठी चर्चा झाली लवकरच या मागण्या पूर्ण होतील असे लेखी आश्वासन सर्व अधिकारी वर्गाने दिले .मागण्या वेळेत न मान्य झाल्यास उग्र स्वरूपाची आंदोलने मोर्चे महाराष्ट्राभर छेडली जातील असा इशारा शेखरभैय्या खिलारे यांनी दिला आहे..