पुरोगामी संघर्ष परिषद तळागाळात पोहोचवणार –जिल्हाध्यक्ष मुसा(भाई) मुल्ला

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
कागल:- पुरोगामी संघर्ष परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांनी सर्वच जाती धर्मातील लोकांना संघटनेमध्ये पुरोगामी विचाराने एकत्र करून पुरोगामी संघर्ष परिषद या सामाजिक संघटनेची स्थापना केली असून , संघटनेची ध्येय धोरणं आणि छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज यांचे पुरोगामी विचारावर संघटन बळकट करत असताना समाजातील तळागाळापर्यंत पोहोचवणार असल्याचे प्रतिपादन पुरोगामी संघर्ष परिषदेचे कोल्हापूर जिल्ह्याचे युवक जिल्हाध्यक्ष मुसा (भाई) मुल्ला यांनी केले .ते कागल येथे कागल तालुक्याच्या वतीने आयोजित केलेल्या सत्कार समारंभ कार्यक्रमात बोलत होते. सुरुवातीला मुसा(भाई) यांनी रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
स्वागत व प्रास्ताविक सुनील माळगे यानी केले सदर कार्यक्रमास अरबाज पठाण, आकाश जोंधळे, अल्लाउद्दीन शेख,गुलशन पठाण, मोहन माने,रियाज पठाण,साबिज पठाण, बबन पठाण, दस्तगीर शेख,अमीर पठाण,सुमीत सुतार, आकाश चव्हाण, मंगेश चव्हाण, हायातबी पठाण (दादीमां)शाहीन ईप्परगे,रेश्मा काझी,शहीदा पठाण, समीना ईप्परगे,शमा शेख,रेश्मा शेख,प्रमोद शितोळे, सुनील माळगे,सनि शिंगाडे,विकी वायदंडे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.शेवटी आभार अभि आवळे यांनी मानले.