Uncategorized

समाजवादी संजीव साने यांच्या स्मृतीदिना निमित्त सामाजिक कार्यकर्त्यांचे इचलकरंजी येथे संमेलन

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर :-समाजवादी विचारांचे संवेदनशील कार्यकर्ते, पुरोगामी आणि परिवर्तनवादी चळवळीचे प्रसारक संजीवजी साने आज आपल्यात नाहीत. हयात असताना त्यांनी अनेक चळवळीत आणि विकासात्मक कामात योगदान दिले आहे. त्या चळवळीमधून आज महाराष्ट्रात आणि देशभरात अनेक कार्यकर्ते निर्माण झाले आहेत. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी आपले समाज जागृतीचे काम सुरु ठेवले होते. त्यांच्या जीवनाचा संपूर्ण प्रवास हा स्मरणात राहणारा आणि प्रेरणादायी आहे. संजीव साने यांच्या स्मृतीच्या निमित्ताने सामाजिक प्रश्नांवर चर्चा करून कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने   रविवार दि. १६ फेब्रुवारी २०२५ सकाळी १०.३० ते सायं. ४ वा.  समाजवादी प्रबोधिनी हॉल, इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर समाजिक कार्यकर्त्यांचे संमेलन  डॉ. आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्था    यांचे वतीने आयोजित करण्यात आले आहे. आज देशभरात शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी, गरीबी, महिला सुरक्षा. पर्यावरण, सामाजिक असमानता आदी प्रश्नांना समजून त्यावर सखोल चर्चा होणे आवश्यक आहे. आजवर आपण पहात आलोय कि. सामुहिक विचारात खूप मोठी ताकद आहे. यातून उत्तम निर्णय घेता येऊ शकतात. स्थानिक आणि व्यापक मुद्द्यांची ओळख या माध्यमातून केली जाऊ शकते. या निमित्ताने कार्यकर्त्यांमध्ये संवाद आणि सहकार्य वाढवून एक मजबूत नेटवर्क तयार केले होऊ शकेल. यातून समाजाचे सर्व स्तरावरचे प्रश्न सोडवण्यास शक्य होणार आहे. या उद्देशाने कार्यकर्त्यांचे संमेलन आयोजित केले आहे.अशी माहिती एका पत्रकाद्वारे दिली. या संमेलनासाठी .  सुभाष लोमटे,ज्ञानेश्वर ठोकळे,वर्षाताई देशपांडे. निमिष साने,. संजय रेंदाळकर. ललित बाबर हॆ उपस्थित राहणार आहेत. आपण या संमेलनास सहभागी व्हावे व इतरानाही सहभागी करावे. असे आवाहन  अॅड. प्रभा यादव, रविना माने, नीता आवळे, अमोल कदम, शर्मिला केदार, अनिल कांबळे, सुरेश बाबर अनिल जगधने यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close