महावितरण भंडिशेगाव अभियंत्यावर कारवाईची काॅंग्रेसची मागणी

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर :- पंढरपूर तालुक्यातील भंडिशेगाव शाखा अभियंता अनुराग नैतांम यांनी शेतकर्यास दिलेल्या अपमानास्पद वागणुकीबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पंढरपूर तालुका व शहर काॅंग्रेस कमिटीच्यावतीने करण्यात आलेली आहे.
यासंदर्भात महावितरण कार्यकारी अभियंता यांना आज काॅंग्रेस पक्षाच्यावतीने निवेदन देण्यात आले.अभियंता नैतांम यांनी शेतकर्याला दिलेल्या आपमानास्पद वागणुकीचे फोनवरील संभाषण समाजमाध्यमावर प्रसारित झालेले आहे.त्यामुळे शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळलेली आहे.याप्रकरणी नैतांम यांनी शेतकर्याला वापरलेली भाषा मुजोरपणाची व संतापजनक आहे.सदर अधिकार्यास आपण जनतेचे नोकर असल्याचा विसर पडल्याचे दिसून येत असून अशा उर्मट व मुजोर अधिकार्यावर कायदेशीर कारवाई करुन त्याची नोंद संबंधित अधिकार्याच्या सेवा पुस्तकात करण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आलेली आहे.
याप्रसंगी पंढरपूर तालुका काॅंग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष अमरजित पाटील,जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष नागेश गंगेकर,सौ.साधनाताई उगले,जिल्हा सरचिटणीस किशोर जाधव,जिल्हा सचिव राजेंद्र उराडे,अमर सुर्यवंशी,तालुका वरिष्ठ उपाध्यक्ष राहुल कौलगे पाटील,शहराध्यक्ष ॲड.राजेश भादुले,मधुकर फलटणकर,देवानंद इरकर,अक्षय शेळके,शशिकांत चंदनशिवे,संग्राम जाधव,सुहास भाळवणकर,सागर कदम,श्रीमती सुशिलाताई जगताप,गणेश माने व मिलींद आढवळकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते.