Uncategorized
पुरोगामी संघर्ष परिषदेच्या धुळे जिल्हाध्यक्षपदी जितेंद्र साळुंखे

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
आर्वी (ता.जि.धूळे):– पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांच्या सहीचे निवडीचे पत्र उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी नुकतेच जितेंद्र दिगंबर साळुंखे (राहणार आर्वी ता. जि. धुळे )यांना देऊन त्यांची पुरोगामी संघर्ष परिषदेच्या धुळे जिल्हाध्यक्षपदी निवड घोषित केली. निवडीनंतर बोलताना साळुंखे म्हणाले
संघटनेच्या माध्यमातून सामाजिक काम करत असताना माझ्या शिक्षणाचा उपयोग समाजातील मागासलेपण दूर करण्यासाठी व समाजासाठी ज्या शासकीय योजना आहेत त्या सर्व तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्याचे प्रामाणिकपणे काम करून संघटनेच्या ध्येयधोरणांशी बांधील राहीन.
जितेंद्र साळुंखे यांच्या निवडीने त्यांचे पंचक्रोशीत अभिनंदन होत आहे.