एमएचटी-सीईटी २०२२ साठी ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरू ‘स्वेरी’ मध्ये सीईटीचे फॉर्म भरण्याची मोफत सुविधा

छायाचित्र- स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे व स्वेरी चिन्ह व प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता प्रा. करण पाटील.
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूरः शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी स्टेट सीईटी सेल कडून एमएचटी-सीईटी २०२२ या परिक्षेसाठी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या असून दि. १० फेब्रुवारी २०२२ पासून ते गुरुवार दि. ३१ मार्च २०२२ (रात्री ११.५९ वा. ) पर्यंत रजिस्ट्रेशन करण्याची मुदत दिली आहे’ अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.
इंजिनिअरींग व फार्मसीच्या प्रवेशाकरीता अत्यंत महत्वपूर्ण समजली जाणारी एमएचटी-सीईटी २०२२ ही परीक्षा राज्यभर लवकरच होणार असून एमएचटी-सीईटी २०२२ या परीक्षेसाठी नोंदणी करण्याकरिता दि.१० फेब्रुवारी २०२२ ते गुरुवार, दि.३१ मार्च २०२२ च्या रात्री ११. ५९ वाजेपर्यंत मुदत दिली आहे. तरी बारावी सायन्स उत्तीर्ण झाल्यानंतर इंजिनिअरींग व फार्मसीसाठी प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी एमएचटी-सीईटी २०२२ साठी रजिस्ट्रेशन करणे अत्यंत गरजेचे आहे. विद्यार्थी व पालकांच्या सोयीच्या दृष्टीने या परीक्षेसाठी मोफत रजिस्ट्रेशन करण्याची सोय गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरी महाविद्यालयात केली आहे. अर्ज भरताना होणाऱ्या चुका लक्षात घेवून विद्यार्थ्यांनी खात्रीशीर अर्ज नोंदणी करणे अत्यावश्यक आहे, जेणेकरून चुका होणार नाहीत. या एमएचटी-सीईटी २०२२ च्या ऑनलाईन नोदणीसंबंधी अधिक माहितीसाठी मोबा. नंबर–९१६८६५५३६५,९८६०१६०४३१ व ९५४५५५३८७८ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता प्रा. करण पाटील यांनी केले आहे. तसेच विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी महाराष्ट्र तंत्र शिक्षण मंडळाच्या www.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.