Uncategorized

धम्म चक्र प्रवर्तन दिनाच्या रॅलीत मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे हे सहभागी

भीमशक्ती सांस्कृतिक बहुउद्देशीय सामाजिक संस्था व रमामाता महिला मंडळाने काढली भव्य रॅली

 

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर ( प्रतिनिधी)  भीमशक्ती सांस्कृतिक बहुउद्देशीय सामाजिक संस्था व रमामाता महिला मंडळयांचे वतीने  धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्त भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले.दरवर्षी अशोका विजया दशमी दिवशी साजरा केला जातो.भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर १४ आक्टोबर १९५६ रोजी अशोका विजया दशमी दिवशी आपल्या अनुयायी सोबत त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. व हजारो वर्ष थांबलेले  धम्म चक्र प्रवर्तीत केले.
या धम्म चक्र प्रवर्तन दिनाच्या मिरवणुकीत (रॅलीत) मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे हे सहभागी होऊन त्यांनी या प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

यावेळी दिलीप बापू धोत्रे यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

संस्थापक अध्यक्ष संतोष सर्वगोड, जेष्ठ नेते नानासाहेब कदम,अभीराज उबाळे, शिवाजी चंदनशिवे,रवि सर्वगोड, सचिन भोरकडे, किशोर खिलारे, विठ्ठल वाघमारे, सागर गायकवाड,किशोर दंदाडे यांचेसह मोठ्या संख्येने महिला व पुरुष उपस्थित होते.

यावेळी गाण्याच्या तालावर लेझीमचे उत्कृष्ट सादरीकरण करण्यात आले.

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close