Uncategorized

मागेल त्याला रस्ता मागेल त्याला पाणी अनिलदादा सावंत स्व खर्चातून देणार –माजी आमदार रमेश कदम

 

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल 

श्रीकांत कसबे

पंढरपूर –माझ्या सारख्या नवख्या उमेदवाराला राष्ट्रवादी काँग्रेस कडून 2014साली मोहोळ मतदार संघातून आमदार म्हणूंन संधी मिळाली. पावणे तीन लाख मतदारांचे हित डोळ्यासमोर ठेवून विविध योजना दिल्या. तशाच योजना 252पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातून अनिल दादा सावंत यांना निवडून दिले तर मतदारासाठी देतील. माझ्याशी चर्चा करताना त्यांनी स्पष्ट सांगितले कीं मी आमदार म्हणुन निवडून आलो तर मागेल त्याला रस्ता मागेल त्याला पाणी स्व खर्चातून देणार आहेत .समाजकारण 80%व राजकारण 20% अशी भूमिका घेऊन अनिलदादा सावंत कार्यरत आहेत. त्याचे कडे विकासाचा दृष्टीकोन आहे. समोरच्या आमदार असणाऱ्या उमेदवारणे मतदार संघांसाठी 3.5हजार कोटी रुपये आणले असा प्रचार सुरु केला आहे एवढा निधी खर्च केला असता तर मतदार संघाचा काया पालट झाला असता. प्रचार करण्याची वेळ आली नसती घरी बसून निवडून आले असते. अनिलदादा सावंतचे रूपाने कार्यक्षम उमेदवार मिळाला आहे मतदार बंधू भगिनींनी तुतारी वाजवीणारा माणूस या चिन्हा समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांनी जाहीर सभेत केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी नगराध्यक्ष सुभाषराव भोसले, युवकांध्यक्ष संदीप मांडवे, समाधान लोखंडे, शिवसेना उबाठाचे जिल्हाध्यक्ष संभाजी शिंदे, वाकाव चे सरपंच ऋषिकेश सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी माजी नगरसेवक संतोष नेहतराव, सुरेश नेहतराव, माजी नगरसेवक प्रताप गंगेकर, रवी सावंत, अमित कसबे, शिवसेना शहराध्यक्ष रवी मुळे सुधीर अभंगराव  डीपीआय चे शहराध्यक्ष विशाल तुपसौन्दर, तालुकाध्यक्ष सुधाकर मस्के,अजय तुपसौदंर, लक्ष्मण रणदिवे आदी उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close