पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने महाद्वार येथील श्री संत नामदेव पायरी जवळील व्यापारी संकूल व भाविकांसाठी बांधण्यात आलेल्या स्वच्छता गृहाचा उद्घाघाटन समारंभ संपन्न !

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने महाद्वार येथील श्री संत नामदेव पायरी जवळील व्यापारी संकूल व भाविकांसाठी बांधण्यात आलेल्या स्वच्छता गृहाचा उद्घाघाटन समारंभ संपन्न !
पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने महाद्वार येथील श्री संत नामदेव पायरी जवळ व्यापारी संकूल व दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी बांधण्यात आलेल्या स्त्री – पुरुषासाठी स्वतंत्र स्वच्छता गृह असलेल्या सुसज्ज इमारतीचा उद्घाघाटन समारंभ युटोपीयन साखर कारखान्याचे चेअरमन उमेशराव परिचारक यांच्या शुभहस्ते नगराध्यक्षा सौ साधनाताई नागेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, उपनगराध्यक्षा सौ श्वेताताई डोंबे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मणभाऊ शिरसट, मर्चंट बँकेचे चेअरमन नागेश भोसले, पक्षनेते अनिल अभंगराव, गुरुदास अभ्यंकर, विरोधी पक्षनेते सुधीर धोत्रे, सुरेश नेहतराव यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला यावेळी बोलताना उमेश परिचारक यांनी सांगितले की,शहरात व मंदिर परिसरातील व्यापारी व येणाऱ्या यात्रेकरूंची आवश्यकता ओळखून पंढरपूर नगरपरिषदेने मागील पाच वर्षात आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या विशेष प्रयत्नातून शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी आणून शहर विकासाची अनेक लोकोपयोगी कामे पूर्ण केलेली आहेत आज पंढरपूर नगरपरिषद ने सुमारे ८५ लाख रुपये खर्चून हे व्यापारी संकूल व मंदिर परिसरात सर्वांसाठी पुरुष व महिलांसाठी सुसज्ज असे अतिशय चांगले स्वच्छता गृह उभा केले आहे व त्याची निगा व्यवस्थित स्वच्छ राहावी यासाठी लाईट व्यवस्था व 24 तास पाणी या ठिकाणी उपलब्ध करून दिले आहे या केलेल्या कामाबद्दल नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक यांचे आभार व्यक्त केले तसेच या ठिकाणी पूर्वी या जागेत ज्यांची दुकाने होती त्या दुकानदाराने हे व्यापारी संकुल उभा करणेकामी व स्वच्छता गृह बांधकाम करणे कामी सहकार्याची भूमिका घेतल्याने या बाधित झालेल्या तिन्ही व्यापार्यांना गाळे देणार असल्याचे सांगितले यावेळी नगराध्यक्षा भोसले व बालाजी पुदलवाड यांनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमास नगरसेविका सुप्रिया डांगे, सौ रेणूका घोडके,नगरसेवक विक्रम शिरसट, संजय निंबाळकर सुजितकुमार सर्वगोड, प्रशांत शिंदे,विवेक परदेशी,नगरसेवक डी राज सर्वगोड, विजय वरपे, जगदिश जोजारे ,शिवाजी अलंकार, नगर अभियंता नेताजी पवार, आरोग्य अधिकारी शरद वाघमारे ,आरोग्य निरीक्षक नागनाथ तोडकर माजी नगरसेवक नाना कवठेकर शैलेश बडवे इब्राहिम बोहरी अर्बन बँकेचे संचालक विनय महाराज हरिदास तसेच भागवत बडवे अमोल डोके, नरेंद्र डांगे, तम्मा घोडके, बसवेश्वर देवमारे, रा पा कटेकर राजगोपाळ भट्टड व परिसरातील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पक्षनेते अनिल अभंगराव यांनी केले आभार पक्षनेते गुरुदास अभ्यंकर यांनी व्यक्त केले .