भारत सरकारच्या प्री मॅट्रिक शिष्यवृत्तीत अनुसूचित जाती अनुसूचित जमातीतील १ ली ते ८वी च्या विद्यार्थ्यांना ठेवले वंचित
एस सी एस टी चे आरक्षण संपवण्याचा घाट पुरोगामी संघर्ष परिषदेचे जिल्हाध्यक्ष कृष्णाजी गायकवाड यांचा आरोप

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
*मोहोळ*:-दि.४आक्टों- केंद्रातील भाजप सरकार हे जातीवादी असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले असून हळूहळू डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांना दिलेले सर्वच क्षेत्रातील आरक्षण संपवत असल्याचा पुरावा केंद्र सरकारने स्वतः दिला असून भारत सरकारची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती ही फक्त नववी व दहावी साठी ठेवून पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या वर अन्याय करून एक प्रकारे आरक्षण संपवत असल्याचीच चूणूक दाखवून दिल्याचा आरोप पुरोगामी संघर्ष परिषदेचे सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष कृष्णाजी गायकवाड (वरिष्ठ) यांनी पत्रकाद्वारे केला आहे.
कृष्णाजी गायकवाड यांनी पत्रकात म्हटले आहे की ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती चालू करत असताना पहिली ते आठवीसाठी अनुसूचित जाती आणि जमातीलाच बाजूला ठेवले असून हे षडयंत्र असलेचा आरोप करुन हे आम्ही सहन करणार नसून केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले यांना निवांत कविता करण्याचा सल्ला देऊन राज्यात फिरू देणार नसल्याचा इशारा ही कृष्णाजी गायकवाड यांनी दिला आहे. पुढे बोलताना पत्रकात कृष्णाजी गायकवाड म्हणाले महाराष्ट्र राज्याचे पुरोगामी संघर्ष परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रा सुभाष वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली या विषयावर तीव्र स्वरूपाचा लढा उभारणार असून वेळप्रसंगी रामदास आठवलेंना आम्ही घेराव घालून जाब विचारणार असल्याचे म्हटले आहे.