पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने शिवस्वराज्य दिन साजरा

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर:-छत्रपती शिवाजी महाराज यांचा रायगडावर प्रतिवर्षी ६ जुन रोजी राज्यभिषेक सोहळा साजरा करण्यात येतो. हा राज्याभिषेक दिन महाराष्ट्र शासनाने शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला . त्यास अनुसरून आज पंढरपूर नगरपरिषद मध्ये “शिवस्वराज्य” दिना निमित्त नगराध्यक्षा सौ साधनाताई नागेश भोसले यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन शिवशक राजदंड भगवा स्वराज्य ध्वज उभारुन स्वराज्य गुढीचे पूजन करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी अनिकेत मनोरकर, पक्ष नेते अनिल अभंगराव सर, गुरुदास अभ्यंकर, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर, नगरसेवक प्रशांत शिंदे, संजय निंबाळकर, सुजित सर्वगोड, विवेक परदेशी ,विजय वरपे, माजी नगरसेवक निलेश डोंबे, सामाजिक कार्यकर्ते नवनाथ रानगट अमोल डोके हे उपस्थित होते.