श्री विठ्ठल कारखाना येथे 7 मे रोजी बायो सीएनजी प्रकल्पाचे भूमिपूजन व शेतकरी मेळावा
- सीएनजी प्रकल्पाचे भूमिपूजन माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्र पवार यांचे शुभहस्ते होणार!

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपूर :-श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना लि. वेणूनगर, गुरसाळे ता. पंढरपूर येथे दिनांक 7 मे रोजी बायो- सीएनजी प्रकल्पाचे भूमिपूजन माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्र पवार यांचे शुभहस्ते आयोजित केला असून यावेळी शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले असल्याची माहिती चेअरमन अभिजित (आबा) पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली.
यावेळी प्रमुख पाहुणे आ. रोहित पवार यांचेसह खा. ओमराजे निंबाळकर, माजी पालकमंत्री दिलीप सोपल, आ. बबनदादा शिंदे आ. रवींद्र धंगेकर, आ. कैलास पाटील, आ. संजयमामा शिंदे, आ. यशवंत माने, माजी आमदार राजन पाटील, माजी आ. दत्तात्रय सावंत, माजी आ. धनाजी साठे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, राष्ट्रवादी चे जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे, राज्य प्रवक्ते उमेश पाटील, राष्ट्रवादी नेते उत्तम जानकर, धनश्री परिवाराचे शिवाजीराव काळुंगे, स्वेरीचे संस्थापक डॉ. बी. पी. रोंगे, मनसे नेते दिलीप धोत्रे, शिवसेना सह संपर्क प्रमुख साईनाथ अभंगराव, जेष्ठ नेते प्रकाशतात्या पाटील, माजी व्हा. चेअरमन नंदकुमार पवार, राष्ट्रवादी मंगळवेढा तालुकाध्यक्ष पी. बी. पाटील, बळीराजा पतसंस्थेचे चेअरमन दामोदर देशमुख, रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहुल शहा, दामाजी कारखान्याचे व्हा. चेअरमन तानाजी खरात, माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले, उद्योग विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते विष्णूभाऊ बागल, मंगळवेढाच्या माजी नगराध्यक्ष अरुणाताई माळी माजी नगरसेवक संतोष नेहतराव आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी राष्ट्रवादी चे प्रदेश प्रवक्ते लतीफभाई तांबोळी, माजी नगराध्यक्ष मुरलीधर दत्तू, शिवसेना ठाकरे गटाचे पंढरपूर तालुकाध्यक्ष संजय घोडके, युवक सचिव राष्ट्रवादी श्रीकांत शिंदे यांचेसह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमास शेतकरी सभासदांसाह आगत्यपूर्व उपस्थित राहावे असे आव्हान चेअरमन अभिजित (आबा) पाटील, व्हा. चेअरमन प्रेमलता रोंगे व संचालक मंडळानी केले आहे.