Uncategorized

स्वेरी’ अभियांत्रिकीच्या ४० विद्यार्थ्यांची टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये निवड!

आत्तापर्यंत ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस' मध्ये स्वेरीच्या तब्बल ३९४ विद्यार्थ्यांची विक्रमी निवड!!

छायाचित्र- स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, स्वेरी लोगो, सोबत टी.सी.एस. मध्ये निवड झालेले चाळीस विद्यार्थी अनुक्रमे अफरोज सय्यद, धनश्री अंबुरे, कविता परदेशी, ऐश्वर्या मुलडे, शिवानी स्वामी, स्मिता ढेंगळे, सुमन राव, तसलीम खतीब, कोमल मोरे, उमेयानी कमलीवाले, वृषाली स्वामी, योगिता मासाळ, किरण केदार, मुस्कान आतार, ऋतुजा कचरे, प्रतिक्षा वागज, वैष्णवी कोरपे, मृणाल फाकडे, अक्षय टकले, गौरव तुळजापूरकर, केदार मुथावट, महेश फुटाणे, प्रवीण शेडबाळे, पूर्वेश पंगुडवाले, रोहित आदलिंगे, सागर बारले, अण्णा शिरसट, सुनील सोनार, स्वप्नील वसेकर, ऋषिकेश होदाडे, प्रनील नागरस, रोहन काळे, चैतन्य कुलकर्णी, प्रताप पोफळे, प्रेम थिटे, पुनीत सोहनी, मल्हार उराडे, योगेश पंडित, ऋषिकेश जाधव व समाधान मासाळ.

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूरः- येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ (टीसीएस) या आंतरराष्ट्रीय कंपनीने घेतलेल्या कॅम्पस इंटरव्युवद्वारे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये ४० विद्यार्थ्यांची निवड झाली असून आत्तापर्यंत टी.सी.एस. मध्ये स्वेरीच्या एकूण ३९४ विद्यार्थ्यांची निवड झाल्याची माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.
आंतरराष्ट्रीय कंपनी ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ ने टीसीएस निंजा एन.क्यू.टी (नॅशनल कॉलीफायर टेस्ट) या देशपातळीवरील ऑनलाईन अॅप्टिट्यूड टेस्टद्वारे आणि त्या नंतरच्या मुलाखत प्रक्रियेद्वारे स्वेरीच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग व कॉम्प्यूटर सायन्स अँन्ड इंजिनिअरिंग विभागातील तब्बल ४० विद्यार्थ्यांची निवड केली. मुलाखतीतून विद्यार्थ्यांच्या गुणात्मक अभ्यासाबरोबरच कमालीची शिस्त, आदरयुक्त संबंध व उत्कृष्ट शिक्षण पध्दती यामुळे निवड समिती अत्यंत प्रभावित झाली. त्यांनी या निवड प्रक्रियेतून अफरोज जाकीर सय्यद, धनश्री राजेंद्र अंबुरे, कविता कांतीलाल परदेशी, ऐश्वर्या प्रदीप मुलडे, शिवानी नागनाथ स्वामी, स्मिता गणपत ढेंगळे, सुमन सदानंद राव, तसलीम रफिक खतीब, कोमल नानासाहेब मोरे, उमेयानी अखिलअहमद कमलीवाले, वृषाली बसवराज स्वामी, योगिता शिवाजी मासाळ, किरण सेनापती केदार, मुस्कान मुक्तार आतार, ऋतुजा प्रवीण कचरे, प्रतिक्षा हनुमंत वागज, वैष्णवी संजय कोरपे, मृणाल महेश फाकडे, अक्षय अंगद टकले, गौरव जयंत तुळजापूरकर, केदार संजय मुथावट, महेश दिलीप फुटाणे, प्रवीण विजयकुमार शेडबाळे, पूर्वेश प्रकाश पंगुडवाले, रोहित चंद्रकांत आदलिंगे, सागर कैलास बारले, अण्णा युवराज शिरसट, सुनील रवींद्र सोनार, स्वप्नील लहू वसेकर, ऋषिकेश सोमनाथ होदाडे, प्रनील प्रकाश नागरस, रोहन सुरेश काळे, चैतन्य लक्ष्मीकांत कुलकर्णी, प्रताप अशोक पोफळे, प्रेम गणेश थिटे, पुनीत अजय सोहनी, मल्हार पांडुरंग उराडे, योगेश धनंजय पंडित, ऋषिकेश कल्याण जाधव व समाधान दादासो मासाळ असे मिळून स्वेरीच्या एकूण ४० विद्यार्थ्यांची निवड टी.सी.एस कंपनीत करण्यात आली. या विद्यार्थ्यांना वार्षिक ३.३६ ते ७ लाख रुपये असे पॅकेज मिळाले आहे. या कंपनीत गतवर्षी पर्यंत स्वेरीच्या ३५४ विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे निवड करण्यात आली होती. त्यात आता या नवीन ४० विद्यार्थ्यांची भर पडली असून टी.सी.एस. कंपनीत आता विक्रमी ३९४ जणांची निवड झाली आहे. शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच नोकरीची संधी उपलब्ध झाल्याने विशेषतः पालक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. एकूणच स्वेरीत मिळणाऱ्या संस्कारामुळे विद्यार्थी प्रगतीच्या दिशेने झेपावत आहेत. सदर विद्यार्थ्यांना प्लेसमेंटचे अधिष्ठाता प्रा. आशिष जाधव, ट्रेनिंगचे अधिष्ठाता प्रा.अविनाश मोटे, विभागप्रमुख व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले तसेच संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांच्यासह पालकांनी कॅम्पस इंटरव्युवमधून निवड झालेल्या या ४० विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close