साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे युवक संघटनेच्या वतिने २६ नोव्हेंबर”संविधान दिन ” म्हणून साजरा
संविधानाचे सामुहिक वाचन व शपथग्रहण सोहळा संपन्न

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपुर:-साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे युवक संघटना शाखा २च्या वतिने २६ नोव्हेंबर”संविधान दिन ” म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी संविधान उद्देशिकाचे सामुहिक वाचन करण्यात येऊन शपथ ग्रहणाचा कार्यक्रम .डाँ. बाबासाहेब आंबेडकर नगर(पाणी टाकी जवळ) संतपेठ येथे संपन्न झाला.

यावेळी श्रीकांत कसबे संपादक जोशाबा टाईम्स यांनी संविधान दिनाचे महत्व सांगीतले. जीवन कांबळे यांनी प्रास्ताविक उद्देशिकाचे वाचन केले. उपस्थीतानी सामुहिक ग्रहण करुन शपथपूर्वक संविधान अंगिकारले.यावेळी माजी नगरसेवक अंबादास वायदंडे, .अनिल कांबळे,संदेश कांबळे,मार्तंड जाधव,अमित वायदंडे, विकास तुपसौंदर, अजय पाटोळे यांचेसह युवक कार्यकर्ते व अंगणवाडी सेविका ढवळे मँडम,कांबळे मँडम, गाडे मँडम..यांची उपस्थीती होती.
शेवटी सर्वाना जिलेबी वाटून आनंदोत्सव साजरा करणेत आला.




