Uncategorized
धीरज विकास सातपुते नीट परीक्षेमध्ये देशात ४१९वा

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपुर:-साधना विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, तावशीचा इयत्ता १२वी मधिल विद्यार्थी धीरज विकास सातपुते हा नीट परीक्षेमध्ये अनुसुचित जाती मध्ये देशात ४१९वा क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाला.त्याच्या या यशाबद्दल त्याचे प्रशालेच्या वतिने मुख्याध्यापक तानाजी अनुसे यांनी अभिनंदन केले.
अत्यंत गरिब परिस्थितीतुन शिक्षण घेऊन हे यश मिळविल्याबद्दल दत्त विद्यामंदिर सुस्ते चे प्राचार्य पाराध्ये सर यांनी धिरज सातपुते यांचे घरी जाऊन सत्कार केला व पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी वडील विकास सातपुते,आई मनिषा सातपुते, चुलते विलास सातपुते आजोबा भागवत सातपुते,शिक्षक चंद्रकांत सातपुते संकेत माने आदी उपस्थीत होते.