Uncategorized

पालखी मार्गाचे भुमीपुजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते रिमोट द्वारे संपन्न

ना.नितिन गडकरी यांनी मंजूर केला ७४कोटी चा निधी

ना.नितिन गडकरी यांचा सत्कार आ.प्रशांत परिचारक व आ.समाधान आवताडे यांनी घोंगडी, तुळसी हार व टाळ ,चिपळ्या, विणा, पगडी देऊन केला.सोबत माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

श्रीकांत कसबे

*पंढरपुर:-:(प्रतिनिधी) संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्ग व इतर राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते व्हिडिओ काँन्फरन्सिंग द्वारे रिमोटने करण्यात आले. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी यावेळी आपल्या भाषणात या दोन्ही पालखी मार्गांच्या उभारणीसाठी 12 हजार कोटी रुपयांचा खर्च लागणार असून यामुळे दळणवळण अगदीच सोपे होणार असल्याचे सांगत वाखरी ते पंढरपूर या मार्गाचा राष्ट्रीय महामार्गात समावेश करत तातडीचे 74 कोटी रुपये मंजूर करत असल्याची घोषणा केली.येथील रेल्वे ग्राउंडवर अनेक मान्यवरांच्या उपस्थीतीत हा सोहळा संपंन्न झाला.
पुढे बोलताना गडकरी म्हणाले , 221 किलोमीटर अंतर असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गासाठी 7 हजार कोटी खर्च अपेक्षित आहे. या मार्गाचं काम पुढील एक ते सव्वा वर्षात पूर्ण होईल, अशी आशा आहे. तसेच संत तुकाराम महाराज पालखी महामार्गासाठी 5 हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या मार्गाची लांबी 130 किलोमीटर इतकी आहे.

दरम्यान, राज्य सरकार या पालखी मार्गावरील पालखी तळांच्या कामासाठी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यानुसार 1248 कोटी खर्च करणार आहे. यामुळे वारकऱ्यांची वारी अजून सोपी होईल. गडकरी म्हणाले , महाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्री जाणारे भक्तीमार्ग तयार करण्याचे काम सुरु आहे, याचा मला सर्वाधिक आनंद होत आहे.

गडकरी म्हणाले, पंढरपूर ही संतांची भूमी, केवळ पंढरपूरच नव्हे तर महाराष्ट्र ही साधूसंतांची भूमी आहे. येथील साहित्य आणि कलेत संतांचं मोठं योगदान आहे.
भारतमाला परियोजनेत देशभरातील 50 धार्मिक स्थळांचा समावेश करण्यात आला आहे. यावर 12070 कोटी रुपये खर्च करुन 673 किलोमीटरचं काम पूर्ण झालं आहे. तर बाकी 827 किलोमीटरचं काम सुप्रीम कोर्टाच्या परवानगीनंतर पूर्ण केलं जाईल. त्यामुळे आगामी काळात भाविक वर्षभर कधीही चारधाम, गंगोत्री, बद्रीनाथला जाऊ शकतील. मानसरोवरचा मार्ग पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्रात तुळजापूर, शेगाव, कोल्हापूर, माहूर, शिर्डी येथील भक्तीमार्ग पूर्ण करण्याचा प्रयत्न जात आहे राज्यातील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गांच्या भूमीपूजन कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी उपस्थित आहेत, याचा मला आनंद होतोय, असं गडकरी म्हणाले.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंढरपूर व संताचा महिमा कथन करुन गुजरात(द्वारका)व काशी यांचे मुळे त्यांचे पंढरपुरशी नजिकचे संबध असल्याचे स्पष्ट करुन महामार्गाला सारे रस्ते जोडले तर लवकर विकास होऊ शकतो पंढरपूर सर्व महामार्गाला जोडले जाणार आहे याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, राज्यपाल भगतसिंग कोशारी,आँनलाइन या कार्यक्रमास जुडले होते.यावेळी केंद्रीय मंत्री व्हि.के.नाईक पालकमंत्री दत्तात्रय भरणे,विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, खा.जयेंद्र स्वामी,खा.रामराजे निंबालकर, माजी मंत्री विजयसिंह मोहीते पाटिल, आ.रणजीतसिंह मोहिते पाटिल, भाजप प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांत पाटील आ.प्रशांतराव परिचारक आ.समाधान आवताडे नगराध्यक्षा साधनाताई भोसले यांचेसह संत,वारकरी पालखी मार्गावरील लोकप्रतिनिधि जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close