Uncategorized

स्वेरीच्या आठ विद्यार्थ्यांची ‘क्यूज कॉर्पोरेशन लिमिटेड’ कंपनीमध्ये निवड

छायाचित्र- स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, स्वेरी लोगो, सोबत ‘क्यूज कार्पोरेशन लिमिटेड’ कंपनीत निवड झालेले विद्यार्थी अनुक्रमे मोहिनी बागल, सायली पाटील, अल्फिया बंगी, समिक्षा डुबल, जान्हवी जगताप, उमेश गुरव, संकेत मोरे व हर्षदीप माने.

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूरः ‘क्यूज कॉर्पोरेशन लिमिटेड’ या नामांकित कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील आठ विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.
‘क्यूज कॉर्पोरेशन लिमिटेड’ या नामांकित कंपनीच्या निवड समितीने गोपाळपूर येथील स्वेरी इंजिनिअरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. या निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातून उत्तीर्ण झालेल्या मोहिनी तानाजी बागल, सायली सुर्यकांत पाटील, अल्फिया अब्दुल हमीद बंगी, समिक्षा नानासाहेब डुबल, जान्हवी नागनाथ जगताप, उमेश बाटेश्वर गुरव, संकेत हनुमंत मोरे व हर्षदीप शैलेश माने या आठ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. श्री. विठ्ठल अभियांत्रिकीमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्या येत असतात आणि कंपनीसाठी पात्र अशा विद्यार्थ्यांची निवड करत असतात. त्यामुळे विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये येथील विद्यार्थी आपले उत्तम करिअर घडवीत आहेत. कंपन्यांच्या गरजांचा सखोल अभ्यास करून संबधित विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागामार्फत विशेष प्रशिक्षकांद्वारे प्रशिक्षण दिले जाते. सदर आठही विद्यार्थ्यांना प्लेसमेंटचे अधिष्ठाता प्रा. आशिष जाधव, ट्रेनिंगचे अधिष्ठाता प्रा.अविनाश मोटे व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ. मिनाक्षी पवार व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध झाल्यामुळे विशेषतः पालक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले तसेच संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांच्यासह पालकांनी कॅम्पस इंटरव्युवमधून निवड झालेल्या आठही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close