बोरगाव माळेवाडी अत्याचार पीडितांना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली भेट
बहुजन यौध्दा प्रतिष्ठान ने भेटीची केली होती मागणी

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
संपादक-श्रीकांत कसबे
अकलूज :-सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी माळेवाडी बोरगाव येथील अत्याचार पीडित कुटुंबाला भेट दिली. यावेळी कठोर कारवाई करण्याचे त्यांनी आश्वासन दिले.माळशिरस तालुक्यातील बोरगाव-माळेवाडी या ठिकाणी राहणाऱ्या मातंग समाजातील साठे कुटुंबाचं अन्याय अत्याचार प्रकरण घडलं त्या प्रकरणी सदर घटना व ॲट्रॉसिटी खोटी आहे.असे म्हणून ॲट्रॉसिटी कायद्याच्या विरोधातील मंडळींनी 9 तारखेला अकलुज येथे मोर्चाद्वारे प्रशासनावर दबाव निर्माण करून आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न चालू केला आहे.तरी सदर केसमधील आरोपींना तातडीने अटक करून कारवाई करावी.सदर घटनेतील वरिष्ठ शासकीय अधिकारी यांच्यावरती दबाव आणला जातोय का ? याचीही आपण चौकशी करावी ! यासाठी बहुजन योध्दा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शेखरभैय्या खिलारे यांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना दि 11/9/2021 रोजी समक्ष माळसिरस तालुका भेटी संदर्भात चर्चा करून निवेदन दिले होते या सर्व प्रकरणात लक्ष घालावे अशी मागणी केली असता माळेवाडी बोरगाव गावी पालकमंत्री यांनी तातडीने भेट दिली व सर्व प्रकरणात लक्ष घालतो न्याय मागणी पूर्ण करतो.असे आश्वासन दिल आहे .
बहूजन यौध्दा प्रतिष्ठान च्या विनंतीला मान देऊन अत्याचार ग्रस्त साठे कुटुंबाला पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी तातडीने भेट दिली त्यासाठी शेखर खिलारे यांनी भ्रमणध्वनी द्वारे त्यांचे आभार मानले.