पवार साहेब कुणाचे ? शेतकर्यांचे की कारखानदारांचे -अमरजीत पाटिल

जोशाबा टाईम्स न्यूज पोर्टल श्रीकांत कसबे अमरजीत पाटिल
पंढरपूर:-साखर कारखान्यांनी एफ आर पी तीन तुकड्यात देण्याचा कायदा केंद्रिय सहकार खात्याने घेतला आहे.यावर देशाचे नेते,माजी केंद्रिय कृषी मंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब काय भुमिका घेतात हे पाहणे महत्वाचे आहे. अशी भुमीका अमरजित पाटील.संस्थापक,कर्मवीर औदुंबरआण्णा पाटील प्रतिष्ठान,पंढरपूर. यांनी पत्रकाद्वारे केली.पवार साहेबांची प्रतिमा ही शेतकर्यांचे तारणहार,जाणता राजा अशी राहिलेली आहे.या सगळ्या पार्श्वभुमीवर “पवार साहेब नेमके शेतकर्यांच्या पाठीशी उभे राहतात की कारखानदारांच्या पाठीशी उभे राहतात हे पाहणे महत्वाचे आहे.” किंबहून आता पवार साहेबांच्या भुमिकेकडे सर्वसामान्य ऊस उत्पादक शेतकरी वर्गाचे डोळे लागलेले आहेत.पवार साहेबांचे राजकीय विरोधक “पवार साहेब जेवतात शेतकर्यांच्या घरात पण हात धुतात कारखानदारांच्या घरातील वाॅश बेसिनला” अशी जहरी टिका अनेक वेळा करत आलेले आहेत.एफ आर पी चे तुकडे पाडण्याच्या निर्णयावर भुमिका घेऊन सदर टिका खोटी ठरवण्याची संधी आयतीच पवार साहेबांना चालून आलेली आहे.
पवार साहेबांनी केंद्राने केलेल्या तीन्ही शेतकरी कायद्यांच्या विरोधात मुंबईमध्ये आझाद मैदानावर झालेल्या निषेध मार्चामध्ये उपस्थितीत राहून आपले सदर कायद्यांना समर्थन नसल्याचे दाखवून दिलेले होते.परंतु,काही दिवसानंतर कृषी कायदे पुर्णपणे रद्द करता येणार नाहीत.अशी केंद्रातील मोदी सरकारची बाजू घेणारी भुमिका घेतली होती. त्यावरुन पवार साहेब नेमके कुणाच्या बाजूचे हा प्रश्न निर्माण झालेला होता ? तसाच प्रश्न आता एफ आर पीचे तुकडे पाडण्याच्या मुद्द्यावर निर्माण झालेला आहे.यावर आपली व आपल्या राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाची भुमिका जाहिर करुन पवार साहेब आपण नेमके शेतकर्यांचे नेते आहात का साखर कारखानदारांचे नेते आहात ? हे सांगण्याची वेळ आलेली आहे.कारण देशामध्ये शेती व शेतकर्यांसाठी अघोषित आणीबाणीची परिस्थिती निर्माण झालेली आहे.