Uncategorized

पंडित कांबळे यांच्या “चरथ भिक्खवे” कवितासंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

संपादक-श्रीकांत कसबे

उस्मानाबाद:-औरंगाबाद येथील निर्भीड व उत्तूंग विचाराचे मराठी साहित्यिकांचे विचारपीठ साप्ताहिक झेपच्या वतीने साहित्य, वृत्तपत्र आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना देण्यात येणारे अत्यंत प्रतिष्ठेचे “मातोश्री हरणाबाई जाधव राज्यस्तरीय वांङमय पुरस्कार 2020” जाहीर करण्यात आले आहेत. त्यात पंडित कांबळे यांच्या “चरथ भिक्खवे” या कवितासंग्रहास हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे

पंडीत कांबळे हे नगर परिषद शाळा क्रमांक 14 उस्मानाबाद येथे प्रभारी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे दोन कवितासंग्रह ,तीन बालकवितासंग्रह, दोन संपादने प्रकाशित झालेली आहेत. कथा, कविता, समीक्षा, ललित, वैचारिक असे अनेक प्रकारांमध्ये त्यांनी लेखन केले आहे. त्यांना अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत.
पुरस्काराचे वितरण डिसेंबर मध्ये औरंगाबाद येथे होणाऱ्या साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची घोषणा कोअर कमिटीने केली आहे. स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र,शाल, आणि पुष्पहार असे पुरस्काराचे स्वरूप आहे असे “झेप”साहित्य संमेलनाचे संयोजक डी.एन.जाधव यांनी कळविले आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल पंडित कांबळे यांचा डॉक्टर विद्याधर बनसोड ,योगीराज वाघमारे, रमेश बोर्डेकर, जयराज खुने,यु.डी. गायकवाड, राजेंद्र धावारे,अतूल लष्करे यांनी अभिनंदन केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close